खूप काही

Farmers Protest In Mumbai : केंद्र सरकारच्या विरोधात महाविकासआघाडी मैदानात, बड्या नेत्यांचा आंदोलनात सहभाग

केंद्र शासनाने पारित केलेल्या कृषी कायद्या विरोधात संपूर्ण देशातील शेतकरी एकवटले आहेत.महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कालपासून आझाद मैदानावर जमा झाले आहेत. या शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ओळख आहे. ते माजी केंद्रीय कृषी मंत्री राहिले आहेत. स्वतः शरद पवार दुपारी आझाद मैदानात जमा झालेल्या शेतकऱ्यांच्या भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेणार असल्याचे म्हटले जात आहे. केंद्रातील मोदी सरकार विरुद्ध सर्व पक्ष असेच समीकरण झाले आहे. आज महाविकास आघाडीतील अनेक नेतेही आझाद मैदानात शेतकऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. त्यामुळे कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीला न्याय मिळेल का, हे पाहणे तेवढेच महत्वाचे आहे.शे

तकरी आंदोलनात शरद पवार सहभागी होणार असल्याच्या विधानावरून भाजपने शरद पवार यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार शरद पवार कृषी कायद्याविरोधात भाषण द्यायला जात आहेत, मात्र बारामतीत ‘रोहित पवारांनी बारामती अ‍ॅग्रो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग’ नावाच्या मोठ्या जाहिराती दिल्या आहेत. त्यासुद्धा कृषी कायद्याच्या संबंधित आहे, लक्षात असाव, असा टोला सोमय्यांनी लगावला आहे.

26 जानेवारीला महाट्रॅक्टर रॅली

6 जानेवारी रोजी होणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीबद्दल दिल्ली पोलीस आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चाही झाली आहे. ट्रॅक्टर रॅलीसाठी शेतकरी मोठ्या संख्यने हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशहून दिल्ली बॉर्डरवर जमा होत आहेत. सिंघु बॉर्डरवर हजारो शेतकरी गेल्या दोन महिन्यापासून आंदोलन करत आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments