कारणआपलं शहरखूप काही

ज्या तुरुंगात स्वातंत्र्यवीरांना वीरमरण; तेच होणार ‘जेल टुरिझम’

पुणे येथील येरवडा जेलमध्ये राज्य सरकार 26 जानेवारी रोजी ‘जेल टूरिझम’ सुरू करणार आहे, जेणेकरून लोकांना ऐतिहासिक कारागृहांना जवळून पाहण्याची संधी मिळू शकेल. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी याची घोषणा केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उप-मुख्यमंत्री अजित पवार 26 जानेवारी रोजी पुण्याच्या येरवडा कारागृहात जेल पर्यटनाचे उद्घाटन करतील, त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना जेलची रचना पाहण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

देशातला हा पहिलाच उपक्रम असणार आहे. जेल टूरिझमचा पहिला टप्पा येरवडा कारागृहातून सुरू होईल. याद्वारे शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि इतरांना ऐतिहासिक स्थळे पाहण्याची संधी मिळणार आहे, अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेल टूरिझमच्या दुसऱ्या टप्प्यात नागपूर मध्यवर्ती कारागृहदेखील पर्यटनासाठी खुले केलं जाईल, अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे.

या तुरूंगात कैद आहेत स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणी

“ब्रिटीश राजवटीत महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, सुभाषचंद्र बोस यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांना येरवडा कारागृहातील तुरूंगात ठेवले गेले होते आणि त्यांच्या आठवणी आजही तेथे संरक्षित राहिल्या आहेत.

तुरूंग पर्यटनादरम्यान प्रवाशांना गाईडची सुविधादेखील पुरविली जाईल. यासाठी त्यांना 5 ते 50 रुपयांपर्यंत रक्कम द्यावी लागेल. सध्या कोरोना साथीच्या आजारामुळे मार्गदर्शक तत्त्वे पाळली जातील आणि दररोज केवळ 50 लोकांना तुरूंगात पर्यटनासाठी परवानगी देण्यात येईल. ठाणे, नाशिक आणि रत्नागिरी येथील तुरुंगदेखील पर्यटन उपक्रमाशी जोडले जातील, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments