खूप काही

मुंबईमधून अनेक दिग्गज खेळाडू बाहेर, आता हे असतील टॉप 11 इंडियन्स…

सध्याच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या विजेत्या मुंबई इंडियन्सने लीगमधील सर्वाधिक विकेट घेणारा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगासह सात खेळाडूंना घरचा आहेर दिला आहे. यॉर्कर किंग म्हणून ओळखल्या जाणारा मलिंगा मागील हंगामात त्याच्या वैयक्तिक कारणामुळे खेळला नव्हता. तर येत्या हंगामापासून त्याने फ्रंचायसिज क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

मलिंगा व्यतिरिक्त, मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिनसन आणि नॅथन कूल्टर नाईल आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मिच मॅकक्लनघन यांनाही मोकळे केले आहे. पुढच्या महिन्यात आयपीएल 2021 साठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. त्यामुळे अनेक दिग्गज खेळाडू आपल्या संघात कसे येतील यासाठी संघ मालकांनी कंबर कसली आहे. त्यासोबतच 2020 मधील IPL मालिका आपल्या नावावर करणाऱ्या मुंबई इंडियन्सनेही आपला संघ तयार केला आहे. त्यात अनेक जुन्या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे, तर काही नव्या चेहऱ्यांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई इंडियन्सने
रिटेन केलेले खेळाडूः रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, ईशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सूर्यकुमार यादव, ख्रिस लिन, मोहसिन खान, सौरभ तिवारी, ट्रेंट बोल्ट

रिलीज केलेले खेळाडू: मिशेल मॅकक्लनघन, जेम्स पॅटिनसन, लसिथ मलिंगा, नॅथन कूल्टर नाईल, शेरुफेन रदरफोर्ड, दिग्विजय देशमुख, प्रिन्स बलवंत राय सिंह

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments