खूप काहीआपलं शहर

आझाद मैदानात घुमणार मराठ्यांचा आक्रोश, या तारखेला होणार महासभा

सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. आरक्षणाच्या निकालासाठी सर्वोच्च न्यायलयातून दिवसेंदिवस तारखा वाढवून दिल्या जात आहेत, त्यामुळे राज्यातील मराठा समन्वयकांनी आक्रमकतेची भूमिका घेतली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून येत्या 10 जानेवारी रोजी मुंबईतल्या आझाद मैदानावर मराठा समन्वयकांची राज्यस्तरीय सभा होणार आहे.

या आधीही अनेकदा मराठा आरक्षणावरुन मुंबईमध्ये अनेक आंदोलने करण्यात आली होती, त्या आंदोलनाची सरकारने दखलदेखील घेतली मात्र परिणाम काहीच झाला नव्हता. आता होणारी सभा ही मोठ्या प्रमाणात होईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची दिली आहे.

या सभेमध्ये मराठा आरक्षणासह सारथी संघटनेच्या प्रश्नावर आवाज उठवला जाणार आहे. या सभेसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक एकवटणार असल्याची माहितीही समोर येत आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मराठा क्रांती मोर्चा संघटनेचे समन्वयक उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मराठा आरक्षणप्रश्नी पुन्हा एकदा मराठा समाजाचा मुंबईत एल्गार पाहायला मिळणार आहे, हे नक्की.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments