फेमस

Rutuja Ravan | मराठमोळ्या एअर हॉस्टेसची जगात चर्चा, देशाच्या इतिहासात कोरलं नाव…

महाराष्ट्रातील ऋतुजा रावणने राष्ट्रीय पातळीवर झेंडा फडकवला आहे. दिल्लीत Diadem Miss India 2020 ही सौंदर्य स्पर्धा सध्याच पार पडली. या स्पर्धेत मीरा रोडच्या ऋतुजा रावणने (Rutuja Ravan) द्वितीय उपविजेतेपद मिळवलं आहे. (Air hostess Rutuja Ravan got the second runner-up in Miss India)

ऋतुजा रावण ही सध्या एका विमान सेवेत एअर हॉस्टेस म्हणून काम करते. तिचं स्वत:चं काम करत तिने या क्षेत्रात आपलं नाव कोरलं आहे. Diadem Miss India 2020 च्या 2nd runnerup पर्यंतचा हा प्रवास सोप्पा नव्हता, असं ऋतजाने दिलेल्या एका मुलाखतीत सांगतिलं आहे.

 

दिल्लीच्या गुरुग्राम येथील किंग्डम ऑफ ड्रीम्समध्ये ब्युटी पेजेन्ट डियाडेम मिस इंडिया आणि मिसेस इंडिया लिगेसी 2020 चं आयोजन करण्यात आलं होतं. देशातील 25 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्या सगळ्यांमध्ये ऋतुजाने तृतीय स्थान पटकावलं आहे.

आपण निवडलेल्या एका क्षेत्राव्यतिरीक्त दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवणे हे तितकं सोप्प नसतं, प्रचंड स्पर्धा असतानादेखील फक्त आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर आपलं स्वप्न पुर्ण केल्याचं ऋतुजा सांगते. वडिलांचं छत्र हरपल्यानंतरही आईने दिलेला आधार, हेच आतापर्यंतच्या प्रवासाचं गमक असल्याचं ऋतुजा सांगते.

जगात स्पर्धा खूप आहे, त्यात तरुणींना खूप मेहनत घ्यावी लागतेच. त्यामुळे प्रत्येकीने विचारपुर्वक आपला मार्ग निवडावा आणि त्या क्षेत्रात पूर्ण तयारीसह मेहनतीने उतरावे. जेव्हा एखाद्या क्षेत्रात तुम्ही स्वत:ला झोकून देता, तेव्हा इतिहास घडतो. एखाद्या स्पर्धेत सामिल होण्याआधीच तिथे मिळणाऱ्या अपयशाच्या कल्पनेने तुम्ही जर स्पर्धेत सहभागी होत नसाल, तर हेच मोठं अपयश असतं, असं ऋतुजा सांगते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments