आपलं शहरखूप काहीफेमस

शिवसेनेच्या आणि महापालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी मावळ्याची मदत…

मुंबई महानगर पालिकेचा महत्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे. कोस्टल रोड प्रकल्पात असणारे दोन भले मोठे बोगदे खणण्यासाठी लागणाऱ्या मशीनचे आज उदघाटन झाले असून आज पासून कामाला सुरुवात होत आहे. त्यामुळे 2018 साली सुरू झालेला कोस्टल रोड प्रकल्प जुलै 2023 मध्ये वापरण्यासाठी खुला करण्यात येईल असा विश्वास पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी व्यक्त केला आहे. आज प्रियदर्शनी येथे मावळा या अत्याधुनिक बोगदा खणणाऱ्या मशीनचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन झाले यावेळी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कस आहे मावळा मशीन?

बोगदा खणणारं मावळा मशीन (टीबीएमचा) हे या प्रकल्पातील महत्त्वाचं साधन आहे. हे मशीन 12.19 मीटर व्यासची आहे. हे भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठ्या व्यासाचे टीबीएम मशीन आहे. या टीबीएम मशीनला “मावळा” असं नाव देण्यात आलं आहे. हे भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठ्या व्यासाचे टीबीएम मशीन आहे. जवळपास 2300 टणाचे मशीन असून 3 मजली इमारती एवढी याची उंची आहे. 11 मीटर बोगद्यात सर्व सुरक्षेची व्यवस्था असेल. या टीबीएम मशीनला मावळा असं नाव देण्यात आलं आहे. अरबी समुद्राखालील तब्बल 175 एकर जमिनीवर भराव टाकण्यात आला आहे. तर अजून 102 एकर समुद्राखालील जमिनीवर भराव टाकण्यात येणार आहे. इतकंच नाही तर या मार्गावर समुद्राखालून 400 मीटरचे बोगदे असतील. हे बोगदे खोदण्यासाठी मावळा हे मशीन आणलं आहे.

असे होणार बोगद्याचे काम…

कोस्टल रोडवर 2.82 किलोमीटरचे दोन बोगदे असणार आहेत. जमिनीपासून 10 ते 70 मीटर खाली हे बोगदे खोदण्यात येतील. जमिनीखालील बोगद्यांमध्ये एकूण 6 लेन असणार आहेत. हे बोगदे खोदणाऱया मशीनला ‘मावळा’ असे मराठमोळे नाव देण्यात आले आहे. बोगद्याच्या अंतर्गत व्यास 11 मीटर असणार आहे. कोस्टल रोडवर जाण्यासाठी अमरसन्स गार्डन येथे 4 ठिकाणी, हाजी अली येथे 8 ठिकाणी, वरळी येथे 6 ठिकाणी इंटरचेंज म्हणजेच वळण रस्ते ठेवण्यात येणार असून ते रस्ते मुंबईतील रस्त्यांना जोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आता मुंबईकरांच्या विकासाच्या लढाईतही आपण असे पुढेच राहू. त्यासाठी या लढाईत अशा अनेक “मावळ्यांची” कामगिरी महत्त्वाची ठरेल. माझी मुंबई आणि माझी महानगरपालिका हा मुंबईकराचा अभिमान आहे. त्यामुळे मुंबईच्या विकासासाठी जगात उपलब्ध असलेले सर्वोत्त्म असे जे जे तंत्रज्ञान, विज्ञान असेल ते आणण्याची आपली परंपरा राहिलेली आहे. यापुढेही ही परंपरा अशीच चालू ठेवणार आहोत.

– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments