आपलं शहर

किशोरी पेडणेकरांना धमकी देणारा अटकेत; कोर्टाचाही दणका

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना 22 डिसेंबर रोजी जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. महापौरांसोबतच त्यांच्या स्वीय सहाय्यकांना देखील धमकीचे फोन आल्याचे सांगत जवळील आझाद मैदान पोलीस स्थानकात महापौर किशोरी पेडणेकर यांनी धाव घेतली. सुरुवातीला त्यांनी हा संपूर्ण प्रकार सांगत एन सी नोंदविली. मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी एन सी चे रूपांतर गुन्ह्यात केले आणि त्वरित तपासाला सुरुवात केली.

सर्वप्रथम धमकीचा फोन आलेल्या नंबरचा तांत्रिक पद्धतीने तपास सुरू केला आणि तपासा दरम्यान धमकी देणारा इसम हा जामनगरमधील मनोज देधिया हा असल्याचे तपासादरम्यान उघड झाले. लगेचचं पोलिसांची एक टीम मनोजला पकडण्यासाठी रवाना झाली आणि त्यांनी मनोजला आपल्या ताब्यात घेतले. आज (7 जानेवारी) मनोजला मुंबईत आणण्यात आले असून कोर्टात हजर करण्यात आले. जीवे मारण्याच्या धमकीचे फोन करण्याच्या गुन्ह्यात कोर्टाने मनोजला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुजरातमधील जामनगरमध्ये राहणारा मनोज देधिया हा दहावी उत्तीर्ण आहे. त्याच्या वडिलांचे जामनगरमध्ये किराणा मालाचे दुकान आहे. वडिलांनी घेऊन दिलेल्या फोनचा वापर मनोज सोशल मीडिया हाताळण्यासाठी करत असे.

महापौर किशोरी पेडणेकरांचा नंबर देखील मनोजला सोशल मीडियाद्वारे मिळाला व त्याचा वापर त्याने तिकडे बसून धमकी देणारे फोन करण्यास केला. असा उपद्व्याप हा मनोजने पहिल्यांदाच केला नव्हता तर याआधी मनोजने अशाच पद्धतीने कर्नाटक राज्यातील एका पोलीस अधिकाऱ्यास धमकी दिली होती. मात्र, त्यावेळी त्या अधिकाऱ्याने मनोजला फक्त खडसावल होत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments