आपलं शहर

मुंबईत वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीच लसीकडे पाठ…

देशभरात सध्या कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे . मुंबईत देखील सव्वा लाख वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पहिल्या फेरीत लसीकरण करण्यात येतं आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पहिल्या टप्यात 1 लाख 39 हजार 500 लसींचा साठा देण्यात आला असून याद्वारे मुंबईत लसीकरण सुरू आहे.

पहिल्या दिवशी 1926 जणांना लसीकरण करण्यात आल्यानंतर नंतरचे दोन दिवस लसीकरण बंद होते. पुन्हा लसीकरण सुरू झाल्यानंतरही वैदकीय कर्मचाऱ्यांनी लसीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे. दिवसाला पालिकेच्या 9 लसीकरण केंद्रात आणि 40 बुथवर जवळपास 4 हजार लोकांना लसीकरण केले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले असताना 19 जानेवारी रोजी पून्हा सुरू झालेल्या लसीकरणात केवळ 3 हजार 200 कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली होती तर त्यापैकी केवळ 1597 जणांनी लसीकरण केंद्रावर जाऊन प्रत्यक्षात लस घेतली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे जेजे रुग्णालयात केवळ 13 जणांनी लस घेतली असून बिकेसी येथील वॅक्सिन सेंटरला 90 जणांनीच लस घेतली आहे.

काल (19 जानेवारी )झालेले लसीकरण

  • केईएम रुग्णालयात ३०७,
  • टिळक रुग्णालयात ११०,
  • कूपर रुग्णालयात २२९,
  • नायर रुग्णालयात १६५,
  • व्ही. एन. देसाई रुग्णालयात ५९,
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात २३६,
  • राजावाडी रुग्णालयात २८५,
  • वांद्रे भाभा रुग्णालयात ९०,
  • बीकेसी कोविड सुविधा केंद्रात ९० ,
  • जेजे रुग्णालयात १३

लोकांच्या मनात भीती नसून लोक स्वतः लसीकरणाची वाट पाहत आहेत. मुंबईत वैदकीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी होण्याचे कारण हे तांत्रिक अडचणी आहेत. यावर प्रशासन काम करत असून लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. काहींना मेसेज गेले नसल्याने त्यांच्यांत गोंधळ निर्माण झाला आहे. आम्हीही लोकांना आवाहन करतो की लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.-विजय कुमार सिंग, प्राध्यापक सायन रुग्णालय

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments