आपलं शहर

मुंबईचा मेगाफास्ट प्रवास लवकरच, या महिन्यात सुरु होणार मेट्रो -2 अ, मेट्रो -7 चा प्रवास

मुंबई मेट्रोच्या पहिल्या स्वदेशी कोचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पहिल्या सहा ट्रेन येत्या 6 महिन्यांत दाखल होतील, तर दर महिन्याला 3 याप्रमाणे उर्वरित ट्रेनचे डबे पुढील 3 वर्षांत मुंबईमध्ये येतील. (Metro-2A, Metro-7 journey will start this month)


एका कोचमधून 380 प्रवासी याप्रमाणे एका मेट्रो ट्रेनमधून 2 हजार 280 प्रवासी प्रवास करू शकणार असल्याची शक्यता मेट्रो अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे, मेट्रो ट्रेनचा वेग ताशी 80 किमी असणार आहे, तर मेट्रो- 2अ आणि मेट्रो-7 च्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा मेट्रो कोच लवकरच मुंबईकरांच्या सेवेमध्ये येणार असल्याचे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

मुंबईत स्वदेशी बनावटीच्या मेट्रोमधून प्रवास करण्याची मुंबईकरांची प्रतीक्षा 2021 मधील मे-जूनमध्ये संपणार आहे. बंगळुरुहून पहिले स्वदेशी मेट्रो कोच मुंबईत दाखल झाले आहेत. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा मेट्रो-2 अ आणि मेट्रो 7 या लाईन काही महिन्यांमध्ये सुरू होणार असल्याची माहिती एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. सोनिया सेठी यांनी दिली आहे.

मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार
मेट्रो -2 अ आणि मेट्रो -7 साठी भारतीय बनवटीचा पहिले मेट्रो कोच मुंबईत दाखल झालेत. मुंबईकरांच्या प्रतिक्षेत असलेली मेट्रोची चाचणी लवकर पूर्ण करून प्रवाशांच्या सेवेत मेट्रो दाखल होईल, असा विश्वास MMRDA चे कमिशनर आर. ए. राजीव यांनी दर्शवला आहे.

मेट्रो -2 अ’चा मार्ग (दहिसर पुर्व ते डीएन नगर)
आनंद नगर, रुशी संकुल, आईसी कॉलनी, एकसार, डॉन बोस्को, शिंपोली, महावीर नगर, कामराज नगर, चारकोप, मलाड मेट्रो, कस्तुरी पार्क, बांगुर नगर, गोरेगाव मेट्रो, आदर्श नगर, शास्त्री नगर, डीएन नगर

‘मेट्रो – 7’ चा मार्ग (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व)
ओवरीपाडा, नॅशनल पार्क, देवीपाडा, मागथाने, महिंद्रा अँड महिंद्रा, बंदोगरी, पुष्पा पार्क, पठानवाडी, आरे, महानंद, जेवीएलआर जंक्शन, शंकरवाडी, अंधेरी पूर्व

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments