आपलं शहर

ऊर्जा मंत्र्यांविरोधात मनसेने दाखल केली तक्रार

लॉकडाउन मध्ये मीटर रिडींग न घेताच ग्राहकांना वीजबिले पाठवण्यात आली. त्यावर सामान्य ग्राहकांनी तक्रारी दाखल केल्या. त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याऐवजी वीजबिल न भरलेल्या ग्राहकांची वीज कापून नेण्याचे व सक्तीने वीजबिल वसूल करण्याचे आदेश ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांना दिले होते. सरकार वीजबिलासंदर्भात ठोस पाऊल उचलेल, या आशेवर असलेल्या ग्राहकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले. यासर्व बाबींवर पर्याय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी आज (२६ जानेवारी ) शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा यासाठी तक्रार पत्र दिले.

“ऊर्जा विभागातील मंत्री आणि अधिकाऱ्यांविरोधात आम्ही तक्रार केली. लॉकडाऊन मध्ये मीटर रिटिंग झालं नाही. आधीच लोक वैतागलेले असताना अधिकचे दर लावून बील त्यांनी पाठवले आहे. आम्ही मंत्र्यांना भेटलो, राज्यपाल्लांनी भेटलो.तरी काही झालं नाही. दिवाळीला गोड बातमी मिळेल, अस देखील सांगितलं गेलं मात्र, तस काहीच झालं नाही. सरकारने लोकांची फसवणूक केली. म्हणून आम्ही तक्रार दाखल केली आहे,” असे मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी स्पष्ट केले.

“सरकारच्या ढिल्या कारभाराला कंटाळून आम्ही ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अस तक्रार पत्र दिलं आहे,” असे देखील ते म्हणाले.सरकारने या संबंधी योग्य ती कारवाई न केल्यास सगळ्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments