फेमसआपलं शहर

मोठी घोषणा; 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी मुंबई लोकल सुरु, मात्र यावेळतच फक्त परवाणगी

येत्या 1 फेब्रुवारीपासून मुंबईतील सर्वसामान्यांसाठी लोकल सुर करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दिवसातील 3 टप्प्यांमध्ये ही सेवा पुरवली जाणार आहे.

सर्वसामान्यांना दरवेळेला प्रवास करणे शक्य नाही, तर पहाटेच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत सर्वसामान्ययांसाठी ही लोकलसेवा पुरवली जाणार आहे. त्यानंतर सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी लोकलसेवा पुरवली जाईल. दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पुन्हा सर्वसामान्यांसाठी ही सेवा पुरवली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या परिपत्रकातून दिली आहे. रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत पुन्हा सर्वसामान्यांसाठी प्रवास करता येईल.

मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या. यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती, त्याचाच प्रत्येय आता येतोय. अनेक मुंबईकरांनी आता सपटकेचा निश्वास सोडल्याचंही दिसतय.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरू करता येईल, याचं नियोजन केलं जात होतं. अखेर त्याबद्दल योग्य निर्णय करण्यात आला आहे. यादृष्टीने विविध पर्यायांवर बैठकही घेण्यात आली होती. त्यामुळे लोकलचं नियोजन कसं असणार आहे, हेच आता 1 फेब्रुवारीपासून समजणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments