कारण

मुंबईच्या महापौरांना धमकी देणारा ताब्यात, मुंबई पोलिसांची गुजरातमधून कारवाई

मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्याला तरुणाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. किशोरी पेडणेकरांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातच्या जामनगरमधून संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं आहे. संबंधीत आरोपीला घेऊन मुंबई पोलिसांचे पथक उद्या (07 जानेवारी रोजी) मुंबईमध्ये दाखल होणार आहे.

मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव मनोज दोढीया आहे. तो फक्त 20 वर्षांचा असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. किशोरी पेडणेकरांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे किंवा धमकी देण्याचं कृत्य त्याने का केलं, याचा खुलासा मुंबई पोलीस करणार आहे. सोबतच त्याने हे कृत्य कोणाच्या सांगण्यावरुन केलय, याचा तपासदेखील मुंबई पोलीस करणार आहेत. पोलीस उपनिरीक्षक विलास तुपे यांच्या पथकाने गुजरातच्या जामनगरमधून ही कारवाई केली आहे. मुंबईत संबंधित तरुणाची चौकशी पूर्ण झाल्यावर त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.

22 डिसेंबर रोजी मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना धमकीचा फोन आला होता, त्यासंदर्भात पत्रकारांसमोर त्यांनी खूलासा केला होता. मला धमकीचे फोन आले होते, त्यात अश्लिल भाषेत शिव्यादेखील देण्यात आल्या होत्या. फक्त मलाच नाही, तर माझ्यासोबत असणाऱ्या स्विय सहायकांनादेखील धमकीचे आणि शिवीगाळीचे फोन आले होते. त्याबद्दल तात्काळ मुंबई पोलिसांना माहिती दिल्याचे किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होत. (Threatening phone call to Mumbai Mayor Kishori Pednekar)

“मी जामनगरमधून बोलतोय, असा उल्लेख धमकी देणाऱ्या इसमाने केला होता. मुंबईचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना फोन करून या सगळ्यांसदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी यावर तात्काळ दखल घेऊ, असे कळवले आहे. पोलिसांनी माझ्यासोबतच माझे पीए, आणि विशाखा राऊत यांचे स्टेटमेंट नोंदवून घेतले आहे.” अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकरांनी दिली होती.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments