आपलं शहर

ठरलं? या तारखेपासून मुंबईसह परिसरातील शाळांचे दरवाजे उघडणार

मुंबईसह राज्यातील सर्व पालकांचा एकच सवाल आहे, तो म्हणजे नेमक्या शाळा कधी सुरु होणार. त्यात आता मुंबई पालिकेने पुढाकार घेतला आहे. येत्या सोमवारपासून म्हणजेच 18 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या शिक्षण विभागाने पालिका आयुक्त इक्बासिंह चहल यांच्याकडे पाठवला आहे. (Schools in the area including Mumbai are likely to start from January 18)

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भात कमी होत आहे, त्यामुळे नियमांचे पालन करत, आर्ध्या पटसंख्येनुसार शाळा सुरु करण्याची परवाणगी द्यावी, अशी माहिती प्रस्तावात नमुद केली आहे. राज्यातल्या अनेक शाळा सुरु झाल्या आहेत. तिथे विद्यार्थ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे, त्याच पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव सादर केला असल्याचं शिक्षण विभागाने म्हटलं आहे.

पालिकेच्या शिक्षण विभागाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई शहर आणि परिसरातल्या नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नियमावलीनुसार विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र आणि शिक्षकांना कोरोनाची लागण झाली नसल्याचा अहवाल, सादर करणे आवश्यक असणार आहे.

पालकांनीही खबरदारी घ्यावी
मुंबईतील शाळा सुरु होताच पालिकांनीही आपली खबरदारी घेणे गरजेचे आहे. शाळांमधील स्वच्छता, डेस्क, टेबल, अनेक ठिकाणांचे र्निजतुकीकरण केले आहे का, याची चौकशीसह पाहाणीही करावी. शाळेमध्ये प्रवेश करताना थर्मामीटर, ऑक्सिमीटर, हात धुण्यासाठी साबण, अनेक ठिकाणी सॅनिटायझरचा वापर होत आहे का, याची पडताळणी करावी. लॉकडाऊनमध्ये काही शाळांचा आयसोलेशन कक्षासाठी वापर करण्यात आला होता, त्या शाळांचेही र्निजतुकीकरण केलेय का, याचा आढावा घेणे गरजेचे आहे, कारण मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे, मात्र संपलेला नाही.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments