आपलं शहर

मुंबईच्या नावे नकोसा रेकॉर्ड, भर लॉकडाऊनमध्ये मोठा पराक्रम

कुठल्याही जागतीक क्रमवारीत, आकडेवारीत किंवा कोणत्या ना कोणत्या रेकॉर्डमध्ये मुंबईचं नाव झळकत असतं, आता अशाच एका यादीत मुंबईचं नाव समोर आलं आहे. (Mumbai traffic congestion escalates)

टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सने जगाच्या पाठीवर सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरांची यादी जाहीर केली आहे. 2020 मध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये मास्को शहराचा नंबर पहिला आहे, तर आपल्या लाडक्या मुंबई शहराचा क्रमांक दुसरा आहे, त्यामुळे भर लॉकडाऊनमध्ये, वाहतूक बंद असतानाही मुंबईच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.

टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सने जगातील 57 देशांमधील 416 शहरांचे सर्वेक्षण केले होते. या अभ्यासाअंती ही यादी जाहीर केल्याचे टॉमटॉमने म्हटले आहे. या यादीत फक्त मुंबईच नाही तर सहाव्या क्रमांकावर बंगळुरु आणि आठव्या क्रमांकावर दिल्लीची नोंद आहे.

दिवसेंदिवस मुंबईमध्ये वाहतूक कोंडी वाढताना दिसत आहे, कारण याआधी 2018 आणि 2019 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात मंबुई चौथ्या स्थानी होती, ती आता दुसऱ्या स्थानी आलेली आहे. याउलट बंगळुरुमधील वाहतूक कोंडीचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. 2019 मध्ये पाचव्या स्थानी असणारे बंगळुरु शहर 2020 सहाव्या स्थानी आले आहे.

टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या यादीत फिलिपिन्समधील मनिला, कंबोडियामधील बोगोटा, रशियामधील मॉस्को आणि नोव्होसीबीर्स, युक्रेनमधील कॅव्ही, पेरुमधील लिमा, टर्कीमधील इस्तंबूल आणि इंडोनेशियामधील जकार्ता या शहरांचा समावेश आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments