खूप काही

मुंबईत लसीकरणाचा फॉरमॅट सेट, अशी मिळेल मुंबईकरांना कोरोनाची लस…

मागील 10 महिन्यापासून कोरोनाने जगभरात थैमान घातले असताना त्यावर उपाय म्हणून अनेक देशात कोरोनावर लस बनवण्याच काम युध्द पातळीवर सुरु आहे. काही देशात बनवलेल्या लसींच्या वापरासाठी परवानगीदेखील देण्यात आली आहे. या सगळ्यात भारताचा नंबरही प्रथम स्थानी आहे.

रशियानंतर आता भारतातही आपात्कालीन वापरासाठी लसीची परवानगी देण्यात आली आहे. भारतातील सगळ्या राज्यांमध्ये लसीकरणासाठी तयारी सुरु झाली आहे. यात मुंबईतही लसीकरणाची आणि लसीची साठवणूक करण्याची तयारी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सुरू झाली आहे. पालिकेने त्याप्रकारच्या प्रशिक्षणाचं कामही युध्द पातळीवर सुरू केलं आहे.

पहिल्या टप्प्यात आठ केंद्रावरील सव्वा लाख कर्माचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 10 हजार कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 500 पथक आणि 2500 पॅरामेडीकल तैनात असतील, ते सर्व 2 ते 3 शिफ्टमध्ये काम करतील.

कसं होणार लसीकरण

सर्वात आधी सर्व विभागातील आरोग्य सेवक, फ्रन्टलाईन सोशल वर्कर्स आणि त्यानंतर 50 पेक्षा अधिक आणि इतर सहव्याधी असलेल्या नागरिकांना लस देण्यात येईल. मुंबईत पहिल्या टप्प्यात 1 कोटी 20 लाख जणांना लस दिली जाणार आहे. लसीकरण मोहिम 5 टप्प्यात असेल, पहिल्या दोन टप्प्यात साठवूणक आणि वाहतूक यांचा समावेश असेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments