आपलं शहरकारण

विनामास्क खाजगी वाहनांतून प्रवासाला महापालिकेची परवानगी, पण ‘हे’ ठरू शकते दंडाचे कारण

देशभरात हाहाकार माजविलेल्या कोरोनाचे जाळे हळूहळू कमी होताना दिसत आहे. यातच कोरोनावर इलाज म्हणून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने वाहन धारकांसाठी एक नवीन नियमावली जारी केली आहे. आता मुंबईकर खाजगी वाहनांतून प्रवास करताना त्यांना मास्क घालण्याची सक्ती नसणार आहे. खाजगी वाहनांतून प्रवास आता मुंबईकर विना मास्क करू शकणार आहे. याआधी सर्व वाहनांत प्रवास करताना वाहनधारकांना मास्क घालणे सक्तीचे होते. विनामास्क वाहनधारकांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येत होती.

लसीकरणाला प्रारंभ होताच खाजगी वाहनधारकांसाठी महापालिकेने नवीन नियमावली जारी करत विनामास्क प्रवास करण्याची मुभा दिली आहे. याआधी एप्रिल 2020 पासून वाहनधारकांना मास्क घालणे अनिवार्य होते. मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असे. 8 मार्चपासून महापालिकेकडून मास्क बंधनकारक करण्यात आले होते यावर विना मास्क वाहन धारकांकडून 1 हजार रुपये दंड वसूली केली जात होती. त्यांनतर सप्टेंबर महिन्यात ती कमी करून 200 रुपये करण्यात आली होती. पण आता वाहनधारकांकडून मास्क संदर्भात कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

खाजगी वाहनांना जरी विना मास्क परवानगी महापालिकेकडून मिळाली असली तरी सार्वजनिक वाहनांमध्ये मास्क घालणे अनिवार्य असल्याचे पालिकेने नवीन नियमावलीत नमूद केले आहे. सार्वजनिक वाहनांत असताना मास्क नसेल तर तुम्ही नक्कीच दंडास पात्र ठरू शकता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments