फेमसकारण

डोनाल्ट ट्रम्प यांच्या ‘त्या’ भूमिकेमुळे नरेंद्र मोदी पोहोचले ‘टॉप’ला

अमेरिकेत व्हाईट हाऊसवर झालेल्या हल्ल्यानंतर डोनाल्ट ट्रम्प हे हिंसा वाढवण्यासाठी ट्विट करु शकतात, या पार्श्वभुमीवर त्यांच ट्विटर अकाऊंट ट्विटरवरुन गायब करण्यात आलं आहे, मात्र त्याचा नकळत फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झाला आहे. ट्विटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव राजकीय नेत्यांच्या लोकप्रिय लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आलं आहेत.

अमेरिकेत राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना अपयश मिळालं, मात्र त्यांना ते पचवता येत नाही. अनेक वेळा ट्रम्प यांनी थेट निवडणुकीला विरोध केल्याचं पाहायला मिळालं. याच रागाच्या भरात ट्रम्प समर्थकांनी व्हाईट हाऊसवर हल्ला केला आहे, त्याचे पडसाद आता अमेरिकेत दिसू लागलेत. या हिंसाचारानंतर डोनाल्ट ट्रम्प ट्विट करतील, ज्यामुळे हिंसा अधिक वाढेल, यामुळे आधी त्यांचं अकाऊंट ब्लॉक करण्यात आलं होत, मात्र त्यांनतर ट्विटरकडून त्यांच अकाऊंट कायमचं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सध्या समोर येत आहे, तूर्तास अकाउंट हाईड केल्याचं सांगितलं जात आहे.

कोणाचं पारडं जड?

राजकीय नेत्यांना फॉलो करणाऱ्या यादीत डोनाल्ट ट्रम्प यांचा पहिला नंबर होता, त्यांचे फॉलोवर्सची संख्या 88.7 मिलीयन अर्थात 8 कोटींच्या घरात होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 64.7 मिलीयन अर्थात 6 कोटी 47 लाखांच्या घरात आहे. मात्र डोनाल्ट ट्रम्प यांचं अकाऊंट बंद करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments