आपलं शहर

थेट बीएमसीला लावला चुना, फक्त 4 हजारांमध्ये क्वारंटाईनमुक्त होण्याची ऑफर

देशासह मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यातलाच एक म्हणजे बाहेरील देशातून अथवा परराज्यातून मुंबईत आल्यास सक्तीचे क्वारंटाईन व्हावं लागणार आहे, मात्र मुंबई विमानतळावर अशा अनेक रॅकेटचा सुळसुळाट सुरु आहे, ज्यांना 4 हजार दिल्यास क्वारंटाईन राहण्याची गरज नाही. नेमका काय प्रकार आहे, हेच आपण पाहाणार आहोत. (No need for quarantine after coming from abroad)

परदेशातून आलेल्या अथवा परराज्यातून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी आणि त्यांना क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन राहण्याच्या सुचना देण्यासाठी मुंबई पालिकेने एका सब इंजिनीअरला तैनात केलं होतं. या सब इंजिनिअरचं नाव आहे दिनेश गावंडे. मात्र हाच दिनेश मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या अनेक परदेशी नागरिकांची फसवणूक करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

35 वर्षीय सब इंजिनीअर दिनेश गांवडे आणि त्याच्या इतर दोन साथीदारांकडे अनेक प्रकारची बनावट कागदपत्रे सापडली आहेत. दिनेशच्या बॅगमधून सौदी अरेबियाच्या चलनातील रोकड (भारतीय चलनानुसार 35 लाख रूपये), 200 सौदा रियाल, होम क्वारंटाईनचे बनावट स्टॅम्प, काही लेटरहेड्स आणि त्यावर काही डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सब-इंजिनीअरला मुंबई महानगरपालिकेने विमानतळावर तैनात केले होते, असे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

युरोप किंवा इतर आखाती देशातून आलेल्या नागरिकांसाठी सक्तीचे संस्थात्मक क्वारंटाईन होणे गरजेचे आहे, मात्र अशा नागरिकांकडून 4 हजार रुपये घेऊन त्यांना होम क्वारंटाईनचे लेटर देण्याचे काम दिनेश करत होता. अंधेरी मधील शकील सलीम, मालाडमधील खान अरबाझ सत्तार, नेरळ येथील रियो जॉन यासोबतच दुबई, कुवैतवरुन आलेल्या प्रवाशांचे जबाब नोंदवल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. (No need for quarantine after coming from abroad, quarantine free for only 4 thousand rupees)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments