खूप काही

तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी  वारंवार चेहरा धुवू नये, नाहीतर होऊ शकतात या समस्या…

प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या त्वचेनुसार आपल्या  त्वचेची निगा राखणे गरजेचे असते. जर त्यातूनही तुमची त्वचा जर तेलकट असेल तर तिला अजूनच देखरेखीची गरज असते.(People with oily skin should not wash their face frequently)

प्रत्येकाची त्वचा ही वेगवेगळी असते. त्वचेच्या प्रकृतीच्या हिशोबानेच त्वचेची निगा राखणे गरजेचे आहे. जर तुमची त्वचा तेलकट आहे, तर तुम्हाला खासकरून तुमच्या त्वचेची काळजी घेण्याची गरज आहे कारण तुमची त्वचा खूप ऍक्टिव्ह असते.

तेलकट त्वचा असणाऱ्या लोकांच्या रोमछिद्रातून अधिक प्रमाणात तेल निघत असते, ज्यामुळे ते चेहऱ्यावरही दिसू लागते. यामुळेच महिलांना वारंवार चेहरा धुवावा लागतो. पण जर तुम्हीही असच करत असाल तर ते कटाक्षाने टाळा आणि जाणून घ्या तेलकट चेहऱ्याची निगा कशी राखायची.

वारंवार चेहरा धुतल्याने त्वचेतील चिकटपणा वाढतो
तज्ज्ञांचं मत आहे की तेलकट त्वचा वारंवार धुतल्यामुळे चेहरा तात्पुरता साफ दिसतो; पण त्यामुळे रोमछिद्रांना बळ मिळतं आणि अधिक प्रमाणात त्वचेतील तेलाचा स्त्राव होण्यास सुरवात होते. ज्यामुळे तुमची त्वचा अजूनच चिकट दिसून येते. त्यामुळे इथूनपुढे असे करू नये. चेहरा धुण्यापेक्षा तो पुसून घ्या.

मौइश्चराझर वापर करा
काही लोकांना वाटतं की आपली त्वचा आधीच तेलकट आहे, म्हणून  मौइश्चराझरची गरज नाही, जर तुम्ही असं विचार करता तर ते चुकीचं आहे. तज्ज्ञांचं मत आहे की मौइश्चराझरचा वापर न केल्याने तुमची समस्या कमी होण्याऐवजी वाढेल. मौइश्चराझर हे तुमच्या त्वचेतील चकचकीतपणा कमी करण्याचे काम करतो. कारण हे त्वचेतील सीबमचे उत्पादन कमी करण्यास मदत करते.

विचारपूर्वक प्रॉडक्ट निवडा
ब्युटी प्रोडक्ट असोत किंवा मेकअप प्रोडक्ट, जर तुम्ही योग्य प्रोडक्ट वापरत नसाल तर त्वचेची समस्या वाढेल. तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी ऑइल फ्री प्रोडक्ट वापरावेत. आजकाल अनेक प्रोडक्टवर ऑइल फ्री किंवा फॉर ऑइल फ्री असे लिहिले असते. ते वाचूनच प्रोडक्ट खरेदी करा.

मेकअप रेमोव्हर जरूर वापरा
जेव्हा ही कधी तुम्ही बाहेरून याल तेव्हा मेकअप रेमोव्हर नक्की वापरा. यासाठी तुम्ही नारळाचे तेल, बदामाचे तेल किंवा दूध ही वापरू शकता. हे नैसर्गिक क्लीन्जर चे काम करतात. रात्री मेकअप असतानाच झोपलात तर त्वचेवरील छिद्रे खराब होतात आणि मुरुम वाढू लागण्याची शक्यता असते. याशिवाय रात्री त्वचेच्या रिपेरिं ची ही प्रक्रिया सुरु असते. याचमुळे रात्रीच्या वेळी चेहरा स्वच्छ केला पाहिजे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments