खूप काही

बादशाहला स्टंट पडला महागात, दुचाकीसह स्टंटबाज पोलिसांच्या ताब्यात…

एका चालत्या दुचाकीवर उभेराहून स्टंट करत असल्याचा 1 व्हिडीओ दोन दिवसांपासून प्रचंड व्हायरल होत आहे, याच व्हिडीओचा शोध घेऊन वरळी पोलिसांनी संबंधित तरुणांना ताब्यात घेतलं आहे. (Police arrested a youth who was stunting on a bike in Vikhroli and confiscated his bike)

मुंबईच्या विक्रोळी पार्क साईट इथे असलेल्या सावरकर मार्गावर ही घटना घडली आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या, जीवघेणा स्टंट करणाऱ्या दोघा स्टंटबाजांना विक्रोळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्यांमध्ये अरबाज मोहम्मद हारुन खान आणि अरमान कयूम शेख या दोघांचा समावेश आहे. हे दोघेही घाटकोपरमधील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हा स्टंट व्हिडीओ मागील 3 महिन्यांपूर्वी रेकॉर्ड केला होता. मात्र तो स्टंट व्हिडीओ इन्स्टाग्रामवर आल्यानंतर त्याची चर्चा सगळीकडे होत आहे. या व्हिडीओमध्ये खाली पडलेल्या तरुणाचे नाव अरबाज खान आहे, तसेच त्याच्या सोबत असलेल्या अरमान शेखलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. सोबत व्हिडीओमध्ये वापरलेल्या दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात.

अनेक ठिकाणी असे स्टंट केले जातात, त्याचेच अनुकरण इतर मंडळी करत असतात, त्यामुळे प्रसिद्धीच्या ओघात कुठलेही चुकीचे प्रकार करु नका, असे मुंबई पोलिसांनी आवाहन केले आहे. मुंबईतील दुचाकीस्वारांच्या स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी अशा अनेक स्टंटबाजांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments