आपलं शहर

मुंबई पालिकेची रेल्वेवर मेहरबानी? 527 कोटींच्या थकित बिलाकडे दुर्लक्ष

“सामान्य मुंबईकराने जर 2 किंवा 3 महिन्याचे पाणीबिल भरले नाही तर पालिकेकडून नळजोडणी खंडित केली जाते.” मात्र आता जो प्रकार घडलाय तो सामान्य मुंबईकरांना कितपत पटतो, हे पाहणे गरजेचे आहे. कारण मुंबई पालिकेचे रेल्वेकडून येणाऱ्या तब्बल 527 कोटी रुपयांकडे दुर्लक्ष झाले आहे, तेही मागील 3 वर्षांपासून. (Railway Board owes Rs 527 crore to BMC)

मध्य आणि पश्चिम रेल्वेने पालिकेचे तब्बल 527 कोटी रुपयांचे पाणीबिल थकवले आहे. जरी ही सामान्य मुंबईकरांसाठी मोठी थकबाकी असली तरी पालिकेकडून या कारभारावर कोणतीच कारवाई केली नाही.

मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेला पालिकेडून पाणी पुरवठा केला जातो. मात्र त्याचा मोबदला म्हणून पालिकाही रेल्वे बोर्डाकडून कर आकारत असते. मात्र हाच कर पालिका प्रशासन वसूल केला नसल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. आरटीआय कार्यकर्ते समीर झवेरी यांनी मागितलेल्या  माहितीतून ही बाब उघडकीस आली आहे.

मध्य रेल्वेचे 238 कोटी रुपये, तर पश्चिम रेल्वेचे 289 कोटी रुपयांचे पाण्याचे बिल 2017 पासून थकित आहे. यावर पालिका प्रशासनाकडून रेल्वेला कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मात्र मेहेरबान असल्याचे दिसत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments