फेमस

बादशहाच्या गाण्यात दिसणार रश्मिका मंदानाचा किलर लूक

‘डिअर कॉम्रेड’ आणि ‘गीता गोविंदम’ या चित्रपटांतून प्रकाश झोतात आलेली आणि सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री ‘रश्मिका मंदाना’ लवकरच एका म्युझिक व्हिडीओमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीतदेखील ती पदार्पण करणार असून इथेही ती आपल्या अभिनयाची छाप पाडण्यास तयार आहे. (Dear comrade actress will appear in Badshah’s song)

रॅपर बादशाहच्या टॉप टकर नावाच्या आगामी अल्बममध्ये ती दिसणार आहे. रश्मिकाने स्वतः ट्विट करत म्युझिक व्हिडिओमधील तिचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. अभिनेत्रीचा पहिला लूक रिलीज झाला आणि सर्वांनाच ‘डिअर कॉम्रेड’ फेम अभिनेत्री अनोळखी वाटली. टॉप टकरच्या अल्बममध्ये दिसणाऱ्या रश्मिकाला एकदम कूल अवतारात प्रेक्षकांनी कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे प्रेक्षकांना हा एक सुखद धक्काच असणार आहे.

राजा युवान, जोनिता, अमित उचाना आणि इतर काहीजण या संगित व्हिडिओचा भाग आहेत. सागा म्युझिक आणि वायआरएफ यांच्या सहकार्याने हा अल्बम तयार होत आहे. रश्मिका मंदाना तिचे पंख दाक्षिणात्यसोबतच बॉलिवूडमध्येही पसरवत आहे. दरम्यान, ती ‘मिशन मजनू’ या आगामी चित्रपटाद्वारे सिद्धार्थ मल्होत्राच्या बरोबरीने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं समोर आलं आहे.

रश्मिका सध्या या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईत आहे आणि हैदराबादला परत जाण्यापूर्वी पहिल्या वेळापत्रकातला मोठा भाग ती पूर्ण करणार आहे. आगामी प्रकल्प वास्तविक घटनांनी प्रेरित आहे आणि 1970 मध्ये सेट केला आहे. शंतनू बागची दिग्दर्शित मिशन मजनूचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज झाल्याने त्याही सिनेमाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments