फेमस

मराठी युवा उद्योजक, ज्याच्या कंपनीचे शेअर्स खुद्द रतन टाटांनी विकत घेतले

सध्या मुंबईसह देशात एका युवा उद्योजकाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तो उद्योजक म्हणजे ठाण्यातील अर्जुन देशपांडे. (Ratan Tata assists Arjun Deshpande’s Generic Aadhaar)

ठाण्यातील युवा उद्योजकाची दस्तुरखुद्द रतन टाटा यांनी भेट घेतली आहे. फक्त इतकंच नाही तर त्या युवा उद्योजकाने निर्माण केलेल्या कंपनीचे शेअर्सदेखील रतन टाटांनी विकत घेतले आहेत.

हे जरी तुमच्यासाठी आश्यर्य वाटण्यासारखं असलं, तरी हे घडलंय ठाण्यातील अर्जुन देशपांडेसोबत. अर्जुनाने काही वर्षांपूर्वी जेनेरिक आधारची सुरुवात केली आहे. त्याची चर्चा राज्यासह देशात होऊ लागली आहे.

जेनरिक आधार ही औषधांची विक्री करणारी कंपनी आहे. जेनेरिक आणि इतर कंपनीमध्ये फरक फक्त इतकाच आहे की जेनेरिक आधार थेट उत्पादक आणि सामान्य रुग्ण यांना थेट जोडते. त्यामुळे उत्पादनाच्या छापील कींमतीपेक्षा खूप कमी रकमेत रुग्णांना औषधे मिळतात.

अर्जुन देशपांडेने ही कंपनी वयाच्या 16व्या वर्षी स्थापन केली. ही कंपनी उत्पादकांकडून थेट औषधांची खरेदी करते आणि ग्राहकांना विकते. खासकरून करोनाच्या काळात अर्जुनने अनेक गरजूंना स्वस्तात औषधे पुरवली आहेत.

पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फॉर लोकल अभियान अशा अनेक योजनांचा अर्जुनला फायदा होत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments