कारण

राज ठाकरेंसह भाजपच्या बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात, ठाकरे सरकारचा मोठा दणका…

महाराष्ट्र पोलीस यंत्रणेकडून सुरक्षेच्या वर्गवारीत दुरुस्ती करण्यात आली आहे. अनेक नेत्यांसह व्हीआयपी नागरिंकाच्या सुरक्षेत बदल करण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, यु.डी. निकम, शत्रूघ्न सिन्हा अशी बड्या नागरिकांची नावे या यादीमध्ये आहेत. असा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. (Reduction in security of BJP leaders including Raj Thackeray and Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते आशीष शेलार, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. यांच्यासोबतच अमृता फडणवीस, दिवीजा फडणवीस, नारायण राणे, राम कदम, प्रसाद लाड, शोभाताई फडणवीस, माधव भंडारी यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, शत्रूघ्न सिन्हा यांना आता वायप्लस एस्कॉर्ट सुरक्षा देण्यात येणार आहे. तर अमृता फडणवीस, दिवीजा फडणवीस, सुर्यकांत शिंदे यांना एक्स सुरक्षा देण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेला धोका असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी दिली होती. सबोतच फडणवीस यांची सुरक्षा कमी न करण्याची शिफारसही मुंबई पोलिसांनी केली आहे, तरीही राज्य सरकारने फडणवीसांच्या सुरक्षेत कपात केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments