कारण

धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणू शर्माचा युटर्न, सांगितलं मोठं राजकीय कारण…

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्माने काही दिवसांपूर्वी बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यांनी ही तक्रार दाखल केल्यानंतर लगेचच धनंजय मुंडे यांनी आपली बाजू फेसबुकच्या माध्यमातून मांडली होती.

धनंजय मुंडे यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अनेक भाजप नेत्यांनी मुंडे यांना त्यांच्या पदावरून तात्काळ हटवण्याची मागणीदेखील केली होती, मात्र राज्य सरकारसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चौकशी झाल्यानंतर कारवाई करण्याचे संकेत दिले होते.

मुंडे यांचं प्रकरण समोर आल्यानंतर भाजप नेते कृष्णा हेगडे आणि मनसे नेते मनिष धुरी, तसेच आणखी एका व्यक्तीने शर्मांविरोधात आरोप केले होते. त्या सर्व आरोपांचे खंडन रेणू शर्मांच्या वकिलांनी पत्रकार परिषद घेत केलं होतं.

मात्र या संपूर्ण प्रकरणाला आता एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. तो म्हणजे, रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. याचवेळी त्यांनी तक्रार मागे घेण्याचं एक मोठं राजकीय कारण देखील सांगितलं आहे.

काय आहे तक्रार मागे घेण्याचं कारण

रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. त्यातील महत्त्वाची घडामोड म्हणजे, या तक्रारीचे झालेले राजकारण होय. राजकारणी माझ्या खांद्यांवरून बंदूक चालवत आहेत आणि काहीजण मला राजकारणासाठी शिकार बनवत असल्याचा गौप्यस्फोट रेणू शर्माने केला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे माझ्या बहिणीत आणि धनंजय मुंडे यांच्यात वाद झाला तर मलाही त्याचा मानसिक त्रास झालाय, म्हणून मी माझी तक्रार मागे घेत आहे, असं झाल्याचं मत रेणू शर्माने मांडलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments