फेमस

सलमान, कतरीना, जॅकलिनला गेलंय वरूण – नताशाच्या लग्नाचं आवतान

बॉलीवूड अभिनेता वरुण धवन व फॅशन डिझायनर नताशा दलाल यांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. हे दोघे २४ जानेवारीला लग्नबंधनात अडकणार असून हा विवाह अलिबाग येथे संपन्न होणार आहे. लग्नाची तयारी सुरु झाली असूनही वरुण हा अजूनही मुंबईत शूटिंग करण्यात व्यस्त आहे. तो उद्या पर्यंत सर्व कामे आटोपून अलिबागला रवाना होणार आहे. वेडिंग प्लॅनर्सची संपूर्ण टीम आधीच रिसॉर्टला पोहोचली असून विवाहसोहळ्याची तयारी करण्यात व्यस्त झाली आहे. लग्न अगदी ३ दिवसांवर आलं असल्याने सगळ्यांचीच धावपळ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार वरुण हा आपल्या फॅन्स सोबत आणि इतर मीडिया सोबतही अगदी मोकळेपणाने बोलत असतो. त्याउलट वरुणचे वडील डेविड धवन यांना कुटुंबाची प्रायव्हसी जास्त महत्वाची असल्याने त्यांनी सगळ्यांनाच त्यांच्या मोबाईलचा कमीतकमी वापर करायला सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं असून हॉटेल मधील स्टाफ सुद्धा कमी ठेवण्यावर भर त्यांचा भर आहे.

आमंत्रित पाहुण्यांमध्ये वरुण आणि त्याच्या वडिलांच्या बॉलीवूडमधील मोजक्याच मित्रांचा समावेश आहे. पाहुण्यांच्या यादीत सलमान खान, कतरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिस या नावांचा देखील समावेश आहे. करण जोहर,श्रद्धा कपूर,अर्जुन कपूर,आलिया भट,साजिद नाडियावाला व शाहरुख खान यांना देखील निमंत्रणे देण्यात आली आहेत. लग्नानंतर रिसेप्शन मुंबईमध्ये करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments