खूप काही

600 किमीच्या सायकल प्रवासासह अनेक उपक्रमांमधून बाळासाहेबांना वंदन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त  महाराष्ट्रभरातून शिवसैनिक बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी शिवाजीपार्क येथे जमले आहेत.  बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर तयारी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमाचे पालन करून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे. (Salute to Balasaheb Thackeray from many activities including 600 km cycle journey)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आज राज्यभरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. शिवसेनेसह विविध सामाजिक संस्था आणि संघटनांनी रक्तदान शिबीर, क्रीडा स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, शैक्षणिक साहित्याचे वाटप, कोरोना योद्धयांचा सन्मान, आरोग्य तपासणी शिबीर, अवयवदान शिबीर, रुग्णांना फळवाटप, ज्येष्ठांना ज्येष्ठ नागरिक कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

जयंतीनिमित्त दरवर्षी हजारो कार्यकर्ते हे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कमधल्या स्मृतिस्थळावर येत असतात. याहीवर्षी शिवसेनेच्या कार्यकर्यांमध्ये तोच उत्साह दिसून आला.

सहाशे किलोमीटरचा प्रवास करून अभिवादन करण्यासाठी तो पोचला स्मृतिस्थळावर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी परभणी जिल्ह्यातून रामचंद्र गायकवाड सायकल वरून 600 किलोमीटरचा प्रवास करून स्मृतिस्थळावर पोहचले आहेत. गेल्या 4 वर्षांपासून मी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सायकलने येतो. 6 दिवसाचा कालावधी मुंबईत पोहाचयला लागतो. दरदिवशी 100 किलोमीटर असा प्रवास होतो.अस मत गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.

मास्क वाटप

कोरोनाच्या सावट अजूनही कायम असल्यामुळें सर्व नियम पाळत हे अभिवादन करण्यात येत आहेत. यावेळी शिवसैनिकांकडून मास्क देखील वाटण्यात आले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments