खूप काही

संजय राऊत याची कन्या विवाह बंधनात; जावई शेर तर व्याही सव्वाशेर

राजकारणातील बहुचर्चित शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कन्या पूर्वशी या लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. आज (31 जानेवारी) राऊत यांच्या कन्येचा साखरपुडा होणार असून या कार्यक्रमाला भल्यामोठ्या राजकारणी लोकांची वर्दळ आज नक्कीच एकत्र पहायला मिळेल. खासदार संजय राऊत राजकारणात सक्रीय असणारे नेते आहे आणि दिवसेंदिवस त्याची प्रचिती आपण सामनाच्या अग्रलेखातून घेतो. आता आपली कन्या हिच्यासाठी वर मात्र राजकारणाबाहेरील शोधला असून ते ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार नार्वेकर हे आहेत. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे अत्यंत कर्तव्य दक्ष आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व समजले जाते.

मागील काही दिवस आधी राऊत यांनी सहकुटुंब शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते पण ही भेट राजकीय नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी सारखपुड्यासाठी पवार यांना आमंत्रित करण्यासाठी भेट घेतल्याचे सांगितले. त्यामुळे आज होणाऱ्या साखरपुड्यात मोठे राजकारणी देखील एकाच ठिकाणी पहायला मिळतील यात काही शंका नाही. राऊत यांच्या घरातील हे पहिलंच मंगलकार्य असून आज सायंकाळी 7 वाजता हा साखरपुडा ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडणार आहे.

राजकारण बाजूला ठेवून या कार्यक्रमास मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमंत्रण देण्यात आले असून हे दिग्गज नेते कार्यक्रमाचे केंद्रबिंदू ठरणार आहेत. यातच ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे नामांकित अधिकारी असल्याचे हा कार्यक्रम आणखीच आकर्षित करणारा ठरत आहे.

खासदार संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर हे त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. त्यांनी रायगड जिल्ह्यात परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. यासोबत त्यांनी ग्रामीण भागात स्वच्छ भारत आणि पंतप्रधान आवास योजना प्रभावीपणे राबवल्या. विशेष म्हणजे 2018 साली मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments