कारण

“असं वागणं बरं नव्हे” राऊतांनी टोचले काँग्रेसचे कान…

औरंगाबादच्या नामकरणाचा मुद्दा दिवसेंदिवस जास्तच चर्चेत येत आहे. किमान समान कार्यक्रमाचे कारण पुढे करत काँग्रेसने या मुद्यात आडकाठी भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादचे नामकरण व्हावे, या मुद्दाला उघड उघड विरोध केला आहे, मात्र शिवसेनेची नामांतराबाबत ठाम भूमिका आहे. (Sanjay Raut’s taunt on Congress)

याचाच आधार घेत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा काँग्रेसचे कान टोचले आहेत. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी नाव न घेता काँग्रेसला कोपरापासून साष्टांग दंडवत घातले आहे.

काँग्रेसचे कान टोचताना संजय राऊत यांनी थेट औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा वृत्तांत दिला आहे. औरंगजेब हा धर्मांध आक्रमक होता. तो ‘सेक्युलर’ अजिबात नव्हता. बाबराने जे अयोध्येत केले तेच औरंगजेब महाराष्ट्रात करीत होता. औरंगजेबाचा सरळ संबंध छत्रपती संभाजी महाराजांच्या वधाशी जोडला गेला आहे. असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं सेक्युलर नव्हे,’ अशी कोपरखळी संजय राऊत यांनी काँग्रेसला लगावली आहे.

भारताची घटना सेक्यूलर आहे म्हणजे बाबर, औरंगजेब, शाहिस्तेखान, ओवेसी, अशा लोकांना सेक्यूलर कसे मानावे, नामकरणाच्या मुद्यावर काँग्रेसची भूमिका काहीही असली तरी औरंगजेबाच्या कोणत्याच खूणा महाराष्ट्रात ठेवू नये, अशा मताचा मोठा वर्ग महाराष्ट्रात असल्याचंही संजय राऊत सामनातून म्हणतात.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments