फेमसखूप काही

जगातील सर्वात श्रीमंत एलॉन मस्क यांच्या प्रगतीमागची रहस्ये; एलॉन यांनी स्वतः दिली माहिती

28 जून 1971 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया मध्ये जन्मलेले एलेन मस्क वयाच्या 49व्या वर्षी जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जात आहे. स्पेस-एक्स चे संस्थापक आणि टेस्ला कंपनीचे सीईओ सध्या जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून नावारूपाला आले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही 185 बिलियन डॉलर इतकी आहे.

अमेझॉन कंपनीचे सीईओ जेफ बेझॉज यांची जागा घेत स्वतःची आणि त्यांच्या कंपनीची किंमत त्यांनी मार्केट मध्ये उंचावली आहे.
एलॉन मस्क यांच्या कामाचा व्याप

एलॉन मस्क यांच्या कामाचा व्याप हा विशाल आहे. भविष्यातील कार बनविण्याबरोबर एलॉन यांची टेस्ला कंपनी इलेक्ट्रॉनिक गाड्यांचे भाग आणि बॅटरी बनविते व कार तयार करणाऱ्या कंपन्यांना विकते. इतकेच नव्हे तर वेळोवेळी मागणी वाढत चाललेली व घरांसाठी वापरली जाणारी सौर ऊर्जा प्रणाली त्यांच्या कंपनीच्या मार्फत बनविली जाते. एलॉन मास्क हे अंतराळात संशोधन करणारी कंपनीही चालवितात. त्याचबरोबर ते अमेरिकेत ‘सुपर-फास्ट अंडरग्राउंड ट्रान्सपोर्ट सिस्टम’ डिझाइन करीत आहेत. अमेरिकेतील यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. अमेरिकेत त्याचे आर्थिक जीवन उभारून आले असले तरी त्यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतला असून आई मूळची कॅनडाची आहे व वडील दक्षिण आफ्रिकेचे आहेत.

एलॉन मस्क यांचे बालपण

एलॉन मस्क स्वतःच्या बालपणी विषयी सांगताना म्हणतात, “मी लहानपणी खूप शांत असायचो, त्यामुळे लहानपणी मला खूप छळण्यात आले. मला बालपणापासून पुस्तके वाचण्याची फार आवड होती.” वयाच्या 10व्या वर्षी, एलॉन मस्क कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शिकले आणि वयाच्या 12 व्या वर्षी त्यांनी ‘ब्लास्टर’ नावाचा एक व्हिडिओ गेम तयार केला. जो स्थानिक मासिकाने त्याच्याकडून 500 अमेरिकन डॉलर्समध्ये खरेदी केला. याला एलॉन यांची पहिली आर्थिक कमाई म्हणता येईल.

एलॉन मस्क यांच्या व्यवसायाची सुरुवात खरी तर 1999 मध्ये झाली जेव्हा त्यांनी आणि त्यांचा भाऊ किंबल याने यांच्या सॉफ्टवेअर कंपनी ‘जीप-2’ साठी त्यांनी यशस्वी करार करणारा शोधला. करारातून मिळालेल्या पैशांनी, एलॉन यांनी वयाच्या 27व्या वर्षी नवीन ‘एक्स डॉट कॉम’ नावाची कंपनी खोलली, जिने ‘पैसे पैसे ट्रांसफर करण्यात ही कंपनी मोठी क्रांती करेल’ असा दावा केला. आज ही कंपनी पे-पाल या नावाने ओळखली जात आहे. 2002 मध्ये ई-बे ने ही कंपनी खरेदी केली आणि त्यातून एलॉन यांना 165 मिलियन डॉलर मिळाले. ही त्यांच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात मोठी आर्थिक पुंजी होती.

यानंतर एलॉन यांनी अंतराळ संशोधनाच्या तंत्रावर काम करण्यास सुरवात केली. त्यांच्या या संशोधनाचे नाव ‘स्पेस-एक्स’ असे ठेवले गेले. यामुळे माणूस इतर ग्रहांवर जगू शकेल असे सांगण्यात आले होते. 2004 मध्ये, एलॉन मस्क यांनी टेस्ला इलेक्ट्रिक कार कंपनीची पायाभरणी करत “भविष्यात सर्व काही इलेक्ट्रिक होईल, अंतराळात जाणारे रॉकेट आणि टेस्ला हा बदल घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.” असे ते म्हणाले.

एलॉन मस्क यांच्या यशस्वी होण्यामागची कारणे

● एलॉन मस्क यांचे कामाबद्दल असलेले प्रेम, जिद्द, चिकाटी, व्यवसायाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन आणि कामाबद्दलचा वेगळेपणा त्यांना त्यांच्या जीवनात यशस्वी बनवितो.
● माझ्याकडे किती संपत्ती आहे हे महत्त्वाचे नाही, माझ्या कंपनीची बाजारात असलेली किंमत मला श्रीमंत बनविते. असे एलॉन मस्क सांगतात.
● त्यांच्याकडे भरभरुन असलेले पैसे वाढविणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट नसून कामातील वेगळेपण ही त्याची ओळख आहे.
● एलॉन मस्क सांगतात त्यांना एक व्यवसायीकपेक्षा एका इंजीनियरच्या रूपाने ओळखले जावे. म्हणजे रोज सकाळी ते आलेल्या नवीन समस्या सोडविण्यासाठी उठून धडपड करतील.
● बँकेत किती पैसे आहेत हे एलॉनसाठी महत्त्वाचे नाही. कारण त्यांच्यासाठी ती श्रीमंतिची व्याख्या नाही.
● बदलाच्या धीम्या गतीवर एलॉन विश्वास ठेवत नाही. त्यांना जीवाश्म इंधन शक्य तितक्या लवकर मागे सोडायच्या आहेत. त्याचबरोबर, दीर्घ काळासाठी मानवतेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ते मंगळावर वसाहती विकसित करण्याच्या विचारात पुढील काम करीत आहेत.
● आलेल्या जोखमी पत्करणे आणि त्यांचा न घाबरता सामना करणे हे एलॉन यांच्या जीवनाचे मंत्र आहे.
● टेस्ला मॉडेल-3 तयार करताना एलेन यांनी आठवड्यातील 120 तास काम केले आहे.
● एलेन यांनी अनेक संकटांचा सामना केला, एक वेळ अशी होती की त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून पैसे मागावे लागले होते. पण ते कधीच खचले नाही, कारण ते सांगतात “मंदीच्या काळात मी गरीब झालो असतो, जास्तीत जास्त माझी मुले सरकारी शाळेत शिकली असती, मग त्यात काय एव्हढं, सरकारी शाळेत तर मीही शिकलो आहे.
● त्यांचा हा बेधडक आणि निर्भीडपणा त्यांना इतरांपासून वेगळा करतो.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments