फेमस

अखेर शनायाला मिळाला तिच्या खऱ्या आयुष्यातला ‘गॅरी’, तोही लॉस एंजिलिसचा

“माझ्या नवऱ्याची बायको”मध्ये तिरस्कारी रोल करणाऱ्या शनायाने अर्थात रसिका सुनीलने कमी वेळेत रसिकांच्या मनात घेर घातला. आता खुद्द रसिकाच्या आयुष्यात आणि मनात घेर घालणारा व्यक्ती तिला मिळाला आहे. होय, आपल्या अल्लडपणा आणि हसमुख चेहऱ्यामुळे अख्या महाराष्ट्रात फेमस असणारी रसिका प्रेमात पडली आहे आणि सध्या परदेशी राहून डेटिंग करत आहे.

2021 या नवीन वर्षात रसिकाने आपल्या चाहत्यांना खुल्याने मी प्रेमात पडल्याची नकळत कबुली दिली. रसिकाने नववर्षाच्या पहिल्या दिवशी तिच्या लाखो फॉलोअर्स असलेल्या इन्स्टाग्रामवर तिच्या प्रियकरासोबत फोटो पोस्ट केला. “दो हजार एक किस.. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. 2020 या वर्षभरात अनेक वाईट घडामोडी घडल्या असल्या तरी कृतज्ञ राहण्यासाठी या वर्षाने अनेक कारणं दिली आहेत’, असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं होतं. कृतज्ञ राहण्यासाठी दिलेलं कारण तू आहेस,” असं कॅप्शन देत रसिकाने तिच्या प्रियकरासोबत फोटो पोस्ट केले आहेत.

134693018 265618141560667 2532886617080146668 n 1

कोण आहे रसिकाचा प्रियकर

मराठमोळी अभिनेत्री रसिका सुनील ही आदित्य बिलागी नावाच्या मुलाला लॉस एंजिलिसमध्ये राहून डेट करत आहे. नव्या वर्षाच्या सुरुवात तिने त्याच्यासोबत करत फोटो पोस्ट केला आहे. दोन वर्षांपूर्वी रसिका सुनील बहुचर्चित मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील सर्वात गाजलेलं कॅरेक्टर शनाया सोडून लॉस एंजिलिसला शिक्षणासाठी गेली होती. तेथेच तिची आणि आदित्यची ओळख झाली. आणि ओळखीमधून त्याची जवळीक वाढली. रसिकाने दिलेल्या मुलाखतीत आदित्य बिलागीला डेट करत असल्याचे सांगितले असून लॉस एंजिलिसमध्ये एकमेकांसोबत खूप आनंदी असल्याचे तिने स्पष्ट सांगितले.

135322389 172594247886609 7361665470374298136 n

कोण आहे आदित्य बिलागी ?

आदित्य बिलागी हा एक अभियंता असून तो उत्तम कोरिओग्राफर आहे. उत्तम नृत्यासोबत तो एक कलाकार देखील आहे. फोटोंसोबत त्याच्या डान्स, कोरिओग्राफीचे व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पहायला मिळतील.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments