कारण

मुख्यमंत्री ठाकरेंना नारळ देऊन शरद पवारांनी सत्ता हातात घ्यावी, भाजप नेतेच्या टोला

मागील काही दिवसांत राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांनी राजकीय वातावरण बरेच पेटले आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असून शरद पवारांनीदेखील यासंदर्भातील सर्व निर्णय पक्ष घेईल असे वक्तव्य केल्याने धनंजय मुंडे यांचे राजकीय भवितव्य धोक्यात असल्याचे दिसून येते.

याचदरम्यान मुंबई विभाग पोलीस दलातील आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत धनंजय मुंडे प्रकरणावर चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली.

शरद पवार आणि विश्वास नांगरे पाटील यांच्या भेटीवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. पोलीस अधिकाऱ्याने शरद पवारांची भेट घ्यायला ते काय राज्याचे मुख्यमंत्री आहेत का, असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

तसेच राज्यात कोणतंही पद नसलेल्या पवारांची भेट घेण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. पाठीमागून सूत्र हाताळण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनीच सत्ता हातात घ्यावी असा टोलाही आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना लगावला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments