आपलं शहर

ऑनलाईन नोंदणी असूनही 11 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सायन रूग्णालयाने नाकारली लस…

 

दोन दिवसांच्या तांत्रिक अडचणीनंतर संपूर्ण राज्यात कालपासून पुन्हा लसीकरणाला सुरवात झाली आहे. मुंबईत कोरोना लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद असताना १९ जानेवारी रोजी सायन रुग्णालयातून 11 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस न देताच माघारी पाठवण्याचा प्रकार घडला. ऑनलाइन नोंदणी होऊनदेखील कर्मचाऱ्यांना आधीपासून असलेल्या आजारांमुळे या कर्मचाऱ्यांना लसीचा लाभ आता घेता येणार नाही, असे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.

देशभरात सध्या कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मुंबईत देखील सव्वा लाख वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पहिल्या फेरीत लसीकरण करण्यात येतंय. त्यासाठी १० ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच ४० बुथवर ही प्रक्रिया सुरू आहे. कोविन अँपवर नाव नोंदणी होऊन देखील सगळ्याच कर्मचाऱ्यांना ही लस घेता येईलच असं नाही. सायन रुग्णालयात देखील 11 नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना लस न देता घरी पाठवण्यात आलं. या कर्मचाऱ्यांना लस न देण्याचं कारण म्हणजे त्यांना असलेला पूर्व आजार किंवा इतर कारणे. या 11 पैकी 7 जणांना सुरवातीपासूनच औषध सुरू होते, आणि 3 जणांना ताप जाणवत होता तर एक महिला कर्मचारी नवजात बाळाची माता होती.

केंद्र शासनाने कोणाला लस द्यावी या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून लसीकरण करण्यासाठी ऑनलाइन कोविन अँप मध्ये कर्मचाऱ्यांची नोंदणी केली जात आहे.  कोणाला लस द्यावी व कोणाला देऊ नये हे स्पष्ट असलं तरी अशा आजारांची नोंद करण्याची तरतूद कोविन ऍपमध्ये नाहीय. यामुळे एलर्जी तसेच इतर आजार असलेले लोक लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी येत आहेत. लसीकरण केंद्रावर विचारपूस करताना काल 11 जण एलर्जी व इतर आजार असलेले आढळून आले आहेत. त्यांना लस दिल्यास त्यांच्या जीवावर बेतू शकते म्हणून लस न देताचं त्यांना घरी पाठवण्यात आले, अस रुग्णालयात प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना आता लस नाकारण्यात आली असली तरी येत्या काळात त्यांना योग्य वेळी लस देण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे.

त्यामुळे एखाद्याची ऑनलाइन नोंदणी जरी लसीकरणासाठी झाली, तरी त्यांना लस दिली जाईलच असं नाही. लसीकरणात नाव आलं तरी केंद्रावर गेल्या नंतर आपल्या आजाराची कल्पना तिथे देणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला लस द्यायची की नाही याचा निर्णय डॉक्टरांना घेता येईल आणि पुढील अनर्थ टाळता येईल. त्यामुळे नागरिकांनी देखील घाबरू नये व केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments