कारण

सो कॉल्ड पर्यावरणप्रेमी कुटुंबीय; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

भाजप आणि शिवसेना यांच्यात उघड उघड संघर्ष होत असताना आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील आरे येथे मेट्रो कारशेड साठी झाडांच्या कत्तली घडवून आणल्या होत्या. त्याला स्थागिती देत महाविकास आघाडीने कारशेड कांजूरमार्गला हलविले. त्याच संदर्भात एक ट्विट करून त्यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करून उद्धव ठाकरे यांनी उद्योगपती अन्वय नाईक यांच्याकडून विकत घेतलेल्या जमिनीचा तपशील जाहीर केला आहे. कोर्लाई येथील या जमिनीचा काही भाग जंगलाच्या हद्दीत मोडतो. त्यामुळे या ठिकाणी बंगला बांधताना ठाकरे परिवाराने परवानगी घेतलीच असेल, असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं होतं.

किरीट सोमय्यांच्या या ट्विटला अमृता फडणवीस यांनी रिट्विट करत त्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

सो कॉल्ड पर्यावरणप्रेमी कुटुंबीयांनी जंगलातील जमिनीवर बंगला बांधला आहे का? वाह वाह सरकार, अपनी ही कुल्हाडी से करे निसर्ग पर वार, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments