खूप काहीकारण

एक दिवसाची मुख्यमंत्री बनणार ऊत्तराखंडची सृष्टी

नायक चित्रपटाच्या कथेप्रमाणेच हरिद्वार,ऊत्तराखंडची सृष्टी गोस्वामी २४ जानेवारी रोजी उत्तराखंड राज्याची एका दिवसाची मुख्यमंत्री बनणार आहे. त्या दिवशी सभागृहात एक सभा घेण्यात येणार आहे ज्यात निरनिराळ्या मुद्यांवर चर्चा केली जाईल. ही माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी दिलीये. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.

२४ जानेवारी हा दिवस देशभरात राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच संदर्भात उत्तराखंड बाल संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा उषा नेगी यांनी बुधवारी मुख्य सचिव ओमप्रकाश यांना पत्र पाठविले.त्या पत्रानुसार २४ जानेवारी रोजी मुख्यमंत्रीपदाची संपूर्ण सूत्रे ही एका विद्यार्थिनीच्या हाती सोपवली जातील. त्यासाठीच सृष्टी गोस्वामी हिची निवड करण्यात आली आहे.

सृष्टी ही उत्तराखंडमधील दौलतपूर गावची रहिवासी असून ती रुरकी मधील बीएसएम कॉलेज मधून बी.एससी ऍग्रीकल्चर करत आहे. या एका दिवसात सृष्टी संपूर्ण राज्याच्या विकास कामांचा आढावा घेणार आहे. त्यासाठी एक विशेष सभा आयोजित करण्यात आली असून त्या सभेत प्रत्येक खात्याचे मुख्य अधिकारी मुख्यमंत्र्यांसमोर ५ मिनिटांचे प्रेसेंटेशन देणार आहेत. ही सभा दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान घेण्यात येईल.

”आम्हाला आमच्या मुलीचा प्रचंड अभिमान आहे. प्रत्येक मुलींमध्ये यशाचे शिखर गाठण्याची हिम्मत असते.फक्त आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं असतं,” असं सृष्टीच्या आई वडीलांनी सांगितलं. सृष्टीनेही उत्तराखंडच्या मुख्यमंत्रांचे दिलेल्या संधीबद्दल आभार मानले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments