आपलं शहर

मुंबईची लाईफलाईन सुरू करण्याबाबत राज्य सरकार तयारीत! लवकरच निर्णय

लॉकडाऊन काळामध्ये मुंबईकर सामान्य नागरिकांनी विचारलेला प्रश्न म्हणजे मुंबईची लोकल केव्हा सुरू होणार? आज उद्या करत जवळपास 10 ते 11 महिने उलटून गेले पण लोकलचा प्रश्न अनुत्तरितच आहे. गेले अनेक महिने सामान्य नागरिकांना लोकलच्या प्रवासाला बंदी असल्याने सामान्य नागरिकांची चांगलीच धावपळ मुंबईत होत आहे. सुरवातीला अत्यावश्यक सेवेतील लोकांना रेल्वे सुरू झाल्यानंतर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर महिलांना लोकल सुरू करण्यात आली आहे. पण त्यांनंतर सामान्य लोकांना केव्हा लोकल सेवा सुरू होईल याबाबत प्रश्न चिन्हच आहे.

मुंबईच्या लोकलच्या संदर्भात आज सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकार लवकरच सर्व सामान्य लोकांना एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत सर्वसामान्यांना लोकलमध्ये प्रवास करता येईल. असे या प्रस्तावामध्ये सांगण्यात आले आहे. मात्र,काल राज्यात ब्रिटनमधील नव्या कोरोना स्ट्रेनचे 8 रुग्ण सापडले 5 रुग्ण हे मुंबईमधील आहेत. त्यामुळे आता मुंबई लोकल संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर १३६७ तर, मध्य रेल्वे मार्गावर १७७४ फेऱ्या चालवल्या जात आहेत. ‘लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्याच्या दृष्टीनं या आठवड्यात आढावा घेण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयाला काही वेळ लागेल. स्थानकावरील गर्दीच्या व्यवस्थापनाची व्यवस्था आपल्याकडं नसणं ही ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखण्याच्या दृष्टीनं मोठी अडचण आहे, असे या संदर्भात रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जरी 10 ते 7 पर्यंत लोकल सुरू केली तरी याचा फायदा लोकांना होणार नसल्याने लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments