आपलं शहर

मुंबईतील परेल येथे होणार लसीची साठवणूक; पहा असे होईल लसीचे वितरण

भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूटच्या लसींना केंद्र सरकारने परवानगी दिली असून आता लवकरच कोरोना लसीकरण देशभरात सुरू होईल. येत्या 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट येथून देशभरात 13 ठिकाणी लसींचे वितरण करण्यात येत आहे आणि आज मुंबईतही लसीचे आगमन होत आहे. याबद्दलची माहिती पालिकेतील वरीष्ठ अधिकारी यांनी दिली होती. तसेच लसीचा साठा परेल येथील एफ साऊथच्या पालिका कार्यालयात केला जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. (Storage of the first vaccine at Parel)

प्रथम मुंबईतील कांजूर येथील कोल्ड स्टोरेजमध्ये लस साठवली जाणार होती मात्र या स्टोरेजचे काम अपूर्ण असल्याने लसीचा साठा आता परेल येथे केला जाणार आहे. लसीकरणाच्या मोहिमेसाठी मास्टर ट्रेनरला ट्रेनिंग देऊन लसीकरणासाठी कर्मचारी प्रशिक्षित करण्यात आले आहेत.

मुंबईत लस आल्यानंतर तिची साठवणूक करण्यासाठी कांजूरमार्ग येथे महापालिकेच्या जागेत कोल्डस्टोरेज उभारण्यात आले आहे. या कोल्डस्टोरेजमध्ये एका वेळी 1 कोटी लसी साठवता येऊ शकतात. तसेच परेल येथे एफ साऊथ येथे 10 लाख लसी साठवता येऊ शकतात अशी व्यवस्था पालिकेकडून करण्यात आली आहे. मुंबईमधून सवा लाख आरोग्य कर्मचारी आणि इतर फ्रंट लाईन वर्कर अशा 2 लाख लोकांची नावे कोवीन ऍपवर नोंदवण्यात आली आहेत.

या 2 लाख लोकांना लसीचे दोन डोस दिले जाणार आहेत. त्याप्रमाणात लस येईल अशी अपेक्षा आहे. लस मोठ्या प्रमाणात आल्यास ती कांजूरमार्ग येथे कोल्डस्टोरेजमध्ये साठवली जाईल. मात्र लस कमी प्रमाणात आल्यास परेल एफ साऊथ येथे लस साठवली जाईल. पहिली येणारी लस परेल येथे साठवण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईत लसीकरणाच्या मोहिमेसाठी 5 हजार कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात आली आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेने २265 मास्टर ट्रेनर तयार केले असून त्यांच्या माध्यमातून 2500 कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे ट्रेनिंग देण्यात आले आहे. 5 कर्मचाऱ्यांची 1 टीम या प्रमाणे 500 टीम तयार करण्यात आल्या आहेत. लसीकरण मोठ्या प्रमाणात करता यावे म्हणून आणखी 10 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे. त्यापैकी 5 हजार कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात आले आहे असे मुंबई महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments