आपलं शहर

वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर रेल्वेचा मोठा निर्णय, लवकरच पूर्ण क्षमतेने लोकल सुरू

करोना माहामारीमुळे गेले काही महिने बंद असलेली उपनगरीय रेल्वेसेवा सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा सुरू होण्याची माहिती आहे. येत्या 15 फेब्रुवारीपासून रेल्वे पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यादेखील लोकल सुरू करण्याविषयीबाबत अनेक बैठका सुरु आहेत. (Suburban railway services to likely resume on 15th February)

मागील आठवड्यात मुख्यमंत्री आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी यांनी याचसंदर्भात रेल्वे अधिकार्यांसोबत चर्चा केली आहे. रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याच्या मार्गावर असताना रेल्वेने या आठवड्याच्या सुरूवातीला मुंबई लोकल मार्गावर 204 अतिरिक्त विशेष रेल्वे सेवा सुरू केल्या असल्याची माहिती दिली आहे. आतापर्यंत धावणाऱ्या रेल्वे सेवांची संख्या वाढवून 2985 झाली आहे.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीदेखील फेब्रुवारीमध्ये सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

सुरक्षेचे काय?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गर्दी नियंत्रण आणि व्यवस्थापनाची तयारी सुरू आहे. प्रवाशांना मास्कशिवाय ट्रेनमध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच सरकारने गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रसंगी पोलीस आणि इतर कर्मचारी तैनात करणार असल्याची माहिती दिली आहे.

15 जून रोजी लॉकडाउन नंतर पहिल्यांदा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू झाली होती. तसेच, ऑक्टोबरच्या शेवटी ठरविलेल्या वेळेत महिलांसाठी देखील लोकलमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली होती, त्यामुळे लवकरच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments