एकदम जुनं

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवरच उचलला होता दंडुका, मुंबई पोलिसांचा ‘तो’ कारनामा

मुंबईतील कामाठीपुरातील फोरास रोड   म्हणजे रेड लाईट एरिया. सर्वगुण संपन्न असलेल्या मुंबईला नजर लावणारी आणि दुर्लक्षित केली जाणारी गोष्ट म्हणजे हा मुंबईत चालणार वेश्या व्यवसाय.

गेल्या दीडशे वर्षात मुंबईमध्ये अनेक बदल झाले, अनेक शहरांची नावे बदलली, ओळख बदलली पण गेल्या दीडशे वर्षात या एरियात चालणार व्यवसाय आणि त्या एरियाच नाव मात्र बदललं नाही.

खरे तर या वेश्या व्यवसायाचा इतिहास फार जुना आहे. पोर्तुगीजांच्या काळात अठराव्या शतकाच्या अखेरीस व एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी हा व्यवसाय मुंबईतील फोरासमध्ये सुरू झाला आणि आजतागायत तो सुरू आहे. तेव्हाच्या मुंबई फोर्टमध्ये राहणारे श्रमजीवी रात्री मौजमजेसाठी फोर्ट बाहेरच्या या परिसरात यायचे आणि रात्र जागवून सकाळी पुन्हा कामावर परतायचे.

त्यावेळी या परिसरात अचानक पोलिसांच्या गाड्या येत असत आणि सगळा परिसर सैरभैर होत असे. दंडुके घेऊन पोलीस पटापटा उद्या मारत आणि पळणाऱ्या, इमारतींच्या मागे लपणाऱ्या मुली तसेच त्यांचे गिऱ्हाईक पोलिसांच्या तावडीत सापडत. उरलेले वाचतात आणि गाडी निघून गेली की पुन्हा तो इष्काचा बाजार सुरू होत असे.

आपल्या देशात जरी वेश्या व्यवसाय कायद्याने मान्य नसला तरी एकोणिसाव्या शतकापासून हा व्यवसाय मुंबईत सुरू आहे. सरकारकडून परवानगी नसली तरी आजही तो व्यवसाय कायम आहे. व्यवसाय सुरू झाल्यापासून तो कायदेशीर करावा की नाही असा प्रश्न समोर आला की रंगवलेल्या गालांचा आणि काजळाने भरलेल्या डोळ्यांचे वेश्या व्यवसाय कायदेशीर झाला तरी त्यांच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे, हा प्रश्न उभा राहतो आणि मग सगळं काही निरुत्तर होऊन जातं.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments