खूप काही

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मिळते सगळ्यात स्वस्त चिकण बिर्याणी

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे शासकीय बंगले वर्षा आणि देवगिरी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतात. मात्र आता तिथल्या स्वस्त खाद्यापदार्थामुळे हे बंगले पुन्हा चर्चेत आले आहेत, तेही तिथे मिळणाऱ्या चिकन बिर्याणीमुळे. (The cheapest Chikan Biryani is available at the CM’s bungalow)

या दोन बंगल्यावर येणाऱ्या पाहूण्यांसाठी खानपान सेवा पुरवली जाते. ही सेवा पुरवणारा अनेकवेळी बदलत असते, तीच सेवा यंदा मे. सेंट्रल कॅटरर्स यांना मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी वर्षा आणि देवगिरी बंगल्यावर मिळणाऱ्या अनेक खाद्यपदार्थांचे दर कमी केले आहेत.

मे. सेंट्रल कॅटरर्स, मुंबई यांना हे काम 2023 पर्यंतच्या करारावर मिळाले आहे. लॉकडाऊनमुळे जरी अनेक पदार्थांचे जरी 400 ते 500 रुपयांनी दर वाढले असले, तरी या कंत्राटदाराने या दोन बंगल्यावर येणाऱ्या पाहूण्यांसाठी स्वस्त दरात खाद्य पदार्थ देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील अनेक हॉटेलमध्ये दर पाहिल्यास हे दर अतिशय कमी आहेत. तब्बल 6 ते 7 पट दर कमी आहेत. मागील महिन्यात काढलेल्या 44 पदार्थांचे एकूण बील पाहिल्यास फक्त 1100 रुपये होते, त्यामुळे हे दर कंत्राटदाराला कसे परवडणार, हेच पाहणे गरजेचे आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments