खूप काही

मुंबईतून हळू हळू थंडी गायब, मात्र हवामान खात्याचा दुसराच अंदाज…

मुंबई, पुणे, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे मुंबईतल्या काही भागातून थंडी गायब झाली आहे. (The cold is slowly disappearing from Mumbai)

दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने राज्यातल्या काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, अनेक जागी पावसाने हजेरीदेखील लावली आहे. यासोबतच राज्यातल्या काही भागात पुढील तीन दिवस पाऊस येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

अनेक वर्षानंतर मुंबईत आलेली थंडी अचानक ओसरली असल्याने पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 9 जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मराठवाड्यासह विदर्भामध्ये 8 जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण असणार आहे.

अचानक झालेल्या वातावरण बदलामुळे अनेक आजार पसरण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी थंडी आणि दुपारच्यावेळी कडक ऊन या सगळ्यात पाऊस पडत असल्याने अनेक आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह पुणे, कोकण, मध्य महाराष्ट्रातील नागरिकांनी अती दक्षता घेणं गरजेचं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments