कारण

सरकार बदलले शिवरथही बदलला; बाळासाहेबांचा कट्टर भक्त शिवतीर्थावर हजर

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज (23 जानेवारी) जयंती. शिवसेनेचे शिवतीर्थ समजले जाणाऱ्या दादरच्या शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करण्यासाठी अनेक शिवसैनिक येत असतात. यावर्षी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर कमी प्रमाणात शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. यावर्षी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शासकीय पध्दतीने साजरी केली जात आहे. दरवर्षी शिवतीर्थावर अनेक शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी हजर राहतात, परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमी प्रमाणात शिवसैनिक शिवतीर्थावर हजर झाले आहेत. त्यातील एका शिवसैनिकाने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, ते म्हणजे मोहन यादव. (Balasaheb’s staunch devotee attends Shivteertha)

मोहन यादव हे गेली 16 वर्ष पुणे जिल्ह्यातील केसनन गावातून दुचाकी गाडीला रथाप्रमाणे सजवून शिवतीर्थावर आणतात. यावर्षी देखील ते शिवतीर्थावर हजर झाले आहेत.

ज्याप्रमाणे राज्यात सत्तेची समीकरण बदलली त्याच प्रकारे या रथावर देखील चित्र लावलेली आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचा झेंडा लावून शरद पवार भावी पंतप्रधान असे फोटो देखील लावले आहेत. गेली 16 वर्ष मोहन हे शिवतीर्थावर येत आहेत. यावर्षी दुचाकी रथावर अगदी तिन्ही पक्षाच्या प्रमुखांची छायाचित्रे लावली आहेत. चक्क भावी पंतप्रधान म्हणून शरद पवार यांचे चित्र लावले असून रथाच्या दर्शनी भागावर तिन्ही पक्षांच्या झेंड्यानी लक्ष वेधले आहे.

मी गेली 16 वर्ष शिवतीर्थावर येत असून मला कोणत्या पदाची अपेक्षा नाही, तर केवळ बाळासाहेबांनी केलेलं प्रेम याची परतफेड व बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात असलेली आदराची भावना व्यक्त करण्यासाठी येथे येतो. – मोहन यादव, शिवसैनिक

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments