फेमस

“द कपिल शर्मा शो” होतोय बंद, स्वतः कपिलने केला खुलासा कारण त्याची पत्नी……..

सुपरस्टार कॉमेडियन कपिल शर्मा आता ऑफ एअर जाण्याच्या तयारीत आहे. होय, चाहत्यांनो तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल पण लवकरच “द कपिल शर्मा शो” बंद होणार आहे. स्वतः कपिल यांनी ही बातमी दिली आहे. सोशल मीडियावर सर्वांचा आवडता शो “द कपिल शर्मा शो” बंद होणार असल्याचे कळताच चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पण दुसरीकडे शो बंद करण्यामागचे कारण समजताच चाहते भलतेच खूश होत कपिलवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

“द कपिल शर्मा शो” हा एक कौटुंबिक कार्यक्रम असून या कार्यक्रमाचे जगभरात अनेक चाहते आहे. सोनी टीव्हीवर सर्वात जास्त टीआरपी रेट मिळवणारा हा शो आता लवकरचं प्रेक्षकांना टाटा बाय बाय बोलणार आहे. या शो मध्ये बॉलीवूडचे अनेक दिग्गज उपस्थित राहून आठवड्याच्या शेवटी प्रेक्षकांना मनोरंजीत करत. लाखो चाहते या शो साठी लांबून लांबून हजेरी लावण्यासाठी येत असत. कृष्णा, भारती सिंग, सुमोना चक्रवर्ती, सुनील ग्रोव्हर, अली असगर या चेहऱ्यांना छोट्या पडद्यावर हिरो बनविणारा “द कपिल शर्मा शो” हा कार्यक्रम होता.

भला मोठा चाहता वर्ग आणि भरपूर अशी टीआरपी असताना देखील कपिल शर्मा हा शो का बंद करत आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. कोरोना काळात अनेक अभिनेत्यांना आर्थिक फटका बसला त्यामुळे कपिल शर्माचे शो बंद करण्यामागचे हेच कारण असावे असे अनेक प्रेक्षक सोशल मीडियावर बोलले. पण वास्तव पाहता असे नसून, कपिल आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी आपल्या शो ला टाटा बाय बोलत असल्याचे समजत आहे.

कपिल शर्मा यांची पत्नी गिन्नी चतरथ ही दुसऱ्यांदा गर्भवती असल्याची गुड न्यूज कपिल यांनी स्वतः देत मला माझ्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी पत्नीसोबत घरी काही वेळ व्यतीत करायचा आहे, असं उत्तर कपिलने दिलं. विशेष म्हणजे या उत्तरातून तो दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचं त्याने जाहीर केलं आहे. त्यामुळे शो बंद होणार असल्याची बॅड न्यूज जरी कपिलने दिली असली तरी पुन्हा वडील होणारी गुड न्यूज सोशल मीडियावर जास्त प्रकाशझोतात येत आहे.

कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांचा प्रेमविहाह 2018 साली झाला होता. यातून 2019 ला त्यांनी अमायर नावाच्या गोंडस मुलीला जन्म दिला. आणि आता गिन्नी पुन्हा एकदा आई बनल्या असून कपिल यांना त्यांच्यासोबत वेळ घालविण्यासाठी “द कपिल शर्मा शो” पडद्याआड न्यावा लागत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments