कारण

सोनू सूदच्या कोरोना योद्ध्यांसाठी वापरलेल्या हॉटेलवर पालिकेने केली पोलीस ठाण्यात तक्रार

परवानगी शिवाय जुहूमध्ये असलेल्या सहा माळ्यांच्या निवासी इमारतीमध्ये हॉटेल सुरू केल्याच्या आरोप सध्या मुंबई महापालिकेने लॉकडाऊनमध्ये स्थलांतरितांचा हिरो ठरलेल्या सोनू सूदवर केली आहे. सदर प्रकरणावर सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेने जुहू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

“जुहूमधील निवासी घरात सोनू सूदने परवानगी न घेता एबी नायर रोडवर असणारी सहा माळ्यांची रहिवासी इमारत शक्ती सागर बिल्डिंगचं रुपांतर हॉटेलमध्ये केलं आहे” असा आरोप महापालिकेने पोलिसांकडे तक्रार करत म्हंटलं आहे. शिवाय, महापालिकेकडून नोटीस दिल्यानंतर देखील सोनू सूदने त्याचे बेकायदेशीर बांधकाम थांबविले नसल्याचा आरोप देखील पालिकेकडून करण्यात आला आहे.

महापालिका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मुंबई महापालिकेने पाठवलेल्या नोटिसिवर सोनुने सिव्हिल कोर्टात धाव घेतली होती, पण त्याला दिलासा मिळाला नव्हता. तसेच कोर्टाने सोनूला हायकोर्टात ज्याण्यासाठी 3 आठवड्यांचा वेळ दिला होता पण मुदत संपून गेली तरी सोनू सूदने अद्याप केलेले बदल दुरुस्त केलेले नाहीत. त्यामुळे आम्ही एमआरटीपी कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली आहे.

यावर सोनू सूदने आपली बाजू मांडताना,” इमारतीमध्ये बदल करण्यासाठी मी आधीच मुंबई महापालिकेकडून परवानगी घेतली आहे. सदर विषय हा ‘महाराष्ट्र किनारपट्टी विभाग व्यवस्थापन’ प्राधिकरणाच्या परवानगीचा आहे. कोरोना संकटाच्या परिस्थितीत ही परवानगी मिळू शकली नाही. मी नेहमीच कायद्याचे पालन केलं आहे आणि यामध्ये कोणताही बेकायदेशीर कारभार केलेला नाही. कोरोना संकटात या हॉटेलचा वापर कोरोना योद्ध्यांसाठी करण्यात आला. जर परवानगी मिळाली तर मी पुन्हा याचं रुपांतर निवासी इमारतीत करेन. मी पालिकेच्या तक्रारीविरोधात हायकोर्टात जाणार आहे” असे सांगितले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments