आपलं शहर

आणीबाणीच्या परिस्थितीत पालिका होणार अधिक हायटेक; डीएमआरचा केला जाणार वापर

सर्वांच्या जीवाची असणारी मुंबई संकटाला नेहमीच दोन हात करत थाटात उभी असते. आतंकवादी हल्ला असेल, महापूर, चक्रीवादळ की कोरोनासारखी भयंकर परिस्थिती. मुंबई आणि मुंबईची आपत्कालीन व्यवस्था नेहमीच मुंबईच्या सेवेसाठी तत्पर असते. अनेक संकटांत सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईत आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते. वेळोवेळी या परिस्थितीत मुंबईतील अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा, महापालिका आपले काम तत्परतेने बजावत असते, तरी काही कारणास्तव मदतकार्यात कुठेतरी कमीपणा आढळतो. परंतु आता, म्हणजेच इथून पुढे मुंबईकरांना परिस्थिती काहीशी वेगळी पाहायला मिळेल.

सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई महापालिका अधिक सक्रिय झाली असून आता संकटाच्या आणि आणीबाणीच्या विविध प्रसंगात तीव्र संपर्कासाठी डीएमआर (DMR) म्हणजेच डिजिटल मोबाईल रेडिओ प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे आता हमखास कोणत्याही अडचनीशिवाय तातडीने संपर्क होणार असून संभाव्य धोके टाळता येणार आहे.

मुंबईत आणिबाणीच्या काळात आपत्कालीन यंत्रणेचा मुख्य कणा हा पालिकेचा नियंत्रण कक्ष असतो. आणीबाणीच्या विविध प्रसंगांत मुंबईत मदतकार्य करून मुंबईकरांची जीवित आणि वित्तहानी टाळणारा पालिकेचा नियंत्रण कक्ष आता अधिक हायटेक होणार आहे. आणीबाणीच्या काळात मदतकार्य आणि संपर्कासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षात फोन, हॉटलाइन आणि ऑनालॉग बिनतारी संदेशवहन प्रणाली (VHF) वापरली जाते.

2009 पासून कार्यरत असणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या ऑनालॉग बिनतारी प्रणालीला 10 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे ही प्रणाली बदलून आता अत्याधुनिक अशी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल मोबाईल रेडिओ उपकरणे खरेदी केली जाणार आहेत.

65 बिनतारी संच, वाहनांवर बसवण्यासाठी 60 संच, महत्त्वाच्या विभागांना वापरण्यासाठी 201 वॉकीटॉकी संच, टेलिस्कोपिक अँटेना, 5 रिपिटर संच तसेच प्रोग्रॅमिंग आणि डीसपॅचर असे आपत्कालीन व्यवस्थापन विभाग डीएमआर प्रणाली असलेले यंत्रणे खरेदी करणार असून त्याकरिता ई-निविदेद्वारे कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments