खूप काहीफेमस

देशाच्या सर्वोच्च पुरस्कारावर महाराष्ट्रातील मंडळींचं नाव, सिंधुताईंचादेखील गौरव

पद्म पुरस्कार देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्कारांपैकी एक आहे. ते पुरस्कार 3 विभागामध्ये दिला जातो. पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री अशाप्रकारे हे पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार,

विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, खेळ, नागरी सेवा अशा

वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्यासाठी दिले जातात. पद्मविभूषण हे अपवादात्मक आणि प्रतिष्ठित सेवेसाठी दिले जातात. उच्च ऑर्डरच्या सेवेसाठी पद्मभूषण दिला जातो आणि पद्मश्री कोणत्याही क्षेत्रातील प्रतिष्ठित कामासाठी दिला जातो. हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनादिवशी जाहीर केले जातात.

हे पुरस्कार दरवर्षी भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते औपचारिक समारंभात दिले जातात. दरवर्षी मार्च/एप्रिलच्या आसपास राष्ट्रपती भवनमध्ये हा पुरस्कार वितरणचा कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी राष्ट्रपतींनी 119 पद्म पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे.

या यादीमध्ये महाराष्ट्रातील काही उच्च व्यक्तिमत्त्व शामिल आहेत. श्री. राजकांत देविदास श्रॉफ यांना व्यापार आणि उद्योगात पद्मभूषण जाहिर केला आहे.

श्री.परशुराम आत्माराम गंगावणे यांना कला, श्री.नामदेव स. कांबळे यांना साहित्य आणि शिक्षण, चीसौका. जवांतीबेन जमनादास पोपट यांना व्यापार आणि उद्योग, श्री. गिरीश प्रभुणे आणि सिंधुताई सपकाळ यांना सामाजिक कार्य, अशा क्षेत्रांमध्ये पद्मश्री जाहिर केलेले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments