आपलं शहरखूप काहीफेमस

लसीमधील ‘हे’ घटक विषाणूवर मोठा इलाज, म्हणून ही लस ठरतेय फायदेशीर!

कोरोना संकटातून मुक्तता मिळवण्यासाठी आजपासून राज्यात लसीकरणाला सुरवात झाली आहे. भारत बायोटेक उत्पादित कोवाक्सिन आणि सिरम इन्स्टिट्यूट उत्पादित कोविशिल्ड या स्वदेशी लसींना मान्यता दिली असून आज लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. पण नेमकं या लसीमध्ये आहे काय? का ही लस कोरोनवर प्रभावी ठरत आहे? कोरोनाच्या विषाणूचा नायनाय खरोखर ही लस करू शकते का? या सर्व महत्वाच्या प्रश्नांचा आढावा आज आपण घेणार आहोत. (Is there corona vaccine beneficial?)

कोरोनाची लस प्रभावी का ?

माणसाला विशिष्ट रोगाशी लढण्यास त्याच्या शरीरात असलेली रोगप्रतिकारक शक्ती त्याला मदत करत असते. आपण पाहिले असेल, लस येण्याच्या आधी देखील रुग्ण बरे होत होते, याचे एकमेव कारण होते ते म्हणजे रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती. त्यावर रुग्ण आपोआप कोरोना विषाणूवर मात करत असे. असेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे घटक हे कोरोना लसीमध्ये आहेत. कोरोना रोगाच्या विषाणूविरुद्ध लढणाऱ्या अँटिबॉडीला विषाणू शरीरात येण्यापूर्वी सज्ज ठेवण्याचे काम या कोरोना लसीमार्फत करण्यात येते.

आपल्या शरीरात असलेले आणि रोगाला कारणीभूत ठरतील असे व अर्धमेले विषाणू यावर लसीमार्फत योग्य ती प्रथिने सोडली जातात. ज्यामुळे अर्धमेल्या विषाणूवर तुटून पडण्याची सवय आपल्या शरीरातील अँटिबोडीझला होते. आणि यातून आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

सध्या आपली स्वदेशी लस ही अँटीबॉडीझच्या ‘इम्युनोग्लोबिन-जी’ या प्रकाराशी निगडित असल्यामुळे या अँटीबॉडीझ सर्वच परजीवी (एक जीव जो इतर प्रजातीच्या जीवात राहतो) घटकांशी लढत असतो. त्यामुळे शरीराच्या आत आपोआप अँटीबॉडीझ आपली संख्या वाढवतात. विशेष म्हणजे इम्युनोग्लोबिन-जी हे श्वसनाशी संबंधित असलेल्या अवयवांच्या बाहेरच्या भागाचे परजीवांपासून रक्षण करते. ज्यामुळे शिंका किव्हा खोकण्यातून कोरोनाचा प्रसार रोखता येतो.

कोरोनाचा प्रसार या लसी संपुष्टात आणतील का ?

लसीमार्फत शरीरात वाढणारी इम्युनोग्लोबिन-जी ही अँटीबॉडीझ तयार होत असली तरी कोरोना विषाणूंना ही लस किती प्रमाणात थांबवू शकते, याबद्दल ठोस पुरावे सध्या उपलब्ध नाहीत. जरी लसीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढत असेल, श्वसनमार्गाच्या वरच्या भागात कोरोना विषाणूंची वाढ किंवा प्रजनन थांबविले तरी लस विषाणूंच्या प्रसाराला रोखण्यास किती सक्षम आहे, हे तरी आताच सांगत येत नसल्याचे वक्तव्य अनुभवी करत आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments