आपलं शहरफेमस

जगात भारी IPS अधिकारी, पिंपरीच्या आयरन मॅनचं नाव झळकलं वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये

देशाचे आयपीएस अधिकारी कृष्णा प्रकाश यांनी भारताचं नाव संपुर्ण जगात उज्वल केले आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ‘आयर्न मॅन’ म्हणून ओळखले जाणारे ते पहिले भारतीय सशस्त्र सेना कर्मचारी बनले आहेत. इतकेच नव्हे तर ही कामगिरी करणारे ते देशातील पहिले सरकारी कर्मचारी आहेत. 2017 मध्ये आयपीएस कृष्णा प्रकाश यांनी ‘आयर्न मॅन ट्रायथलॉन’ ही जगातील सर्वात कठीण एकदिवसीय क्रीडा स्पर्धा पूर्ण केली होती.

आयर्न मॅन ट्रायथलॉनमध्ये एका दिवसात 3.8 किमी जलतरण स्पर्धा, 180.2 किमी लांबीची सायकल स्पर्धा आणि 42.2 किमी लांब धावण्याची स्पर्धा पूर्ण करावी लागते. महत्वाचे म्हणजे या सर्व स्पर्धा 16 ते 17 तासांच्या आत पूर्ण कराव्या लागतात.

बुधवारी (२० जानेवारी) सकाळी आयपीएस अधिकारी कृष्णा प्रकाश यांनी ट्विटरवर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या विक्रमाची माहिती दिली आहे. ते सध्या पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ट्विटरवर 3 फोटो शेअर करत ही माहिती दिली. यात त्यांना प्रथम इंडियन गवर्नमेंट सर्वेंट, सिव्हील सर्वंट आणि यूनिफॉर्म्ड सर्विसेस ऑफिसर म्हणून आयर्न मॅन ट्रायथलॉन पूर्ण करण्याचे प्रमाणपत्र दिले आहे.

त्यांच्या ट्विटरवर अनेक बड्या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचाही समावेश आहे. ”शुभेच्छा सर, तुमच्या यशाचा मला आनंद आहे. तुमची चमकण्याची ही वेळ आहे.’असे लिहीत सुनील शेट्टीने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments