कारणआपलं शहर

‘हा तर ढोंगीपणा’ फडणवीसांचा थेट मविआच्या बड्या नेत्यांना टोला

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा येथील शेतकरी दिल्ली येथे 58 हून अधिक दिवस आंदोलन करत आहेत. या आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात राजभवनावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार आहे.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत. याच मुद्द्यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

काही पक्ष जाणीवपूर्वक ढोंगबाजी करत आहेत. शेतकऱ्यांना चुकीच्या गोष्टी सांगून गुमराह करत आहेत.”
काँग्रेसवरदेखील त्यांनी यावेळी टीका केली आहे. या मोर्चाच्या निमित्ताने मंचावर जाणाऱ्या नेत्यांना त्यांनी यावेळी काही सवाल केले आहेत.

1. काँग्रेसने 2019 च्या आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की बाजार समित्या रद्द करा. जर आम्ही सत्तेवर आलो तर बाजार समित्या रद्द करू, त्याचं काय झालं?

2. 2006 साली कंत्राटी शेतीचा कायदा त्यांनी का मंजूर केला?

3. कंत्राटी शेतीचा कायदा 2020 पर्यंत सुरू आहे. यांना महाराष्टाचा कायदा चालतो, तर मग केंद्राचा का नाही?

4.“… ही केवळ ढोंगबाजी”
“महाराष्ट्रात थेट खरेदीचे लायसन्स काँग्रेस, राष्ट्रवादीने दिले होते. चिखली बाजार समितीत थेट खरेदीचे अधिकार कॉर्पोरेटला यांनी दिले. आम्ही ते देखील देत नाही आहोत. ही केवळ ढोंगबाजी करत आहेत.” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी मविआमधील नेत्यांवर केली आहे.

आज होणाऱ्या क्रांतिकारी शेतकरी आंदोलनामध्ये शरद पवार यांच्यासह अनेक बडे नेते सहभागी होत आहेत, केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात मविआने उचललेल्या पावलावर भाजपने टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments