फेमसआपलं शहर

ट्विटरचा कंगनाला दणका, ट्विटर अकाउंट केले बंद !

काहीना काही कारणांमुळे नेहमी वादाच्या भोवऱ्यात असणारी, निरनिराळे ट्विट करुन राज्य सरकारवर ताशेरे ओढणारी बिनधास्त अभिनेत्री कंगना राणावत हिचे ट्विटर अकाउंट अनिर्णित काळासाठी बंद करण्यात आले आहे. यागोष्टीची माहिती कंगनाने स्वतः ट्विट करत दिली आहे. ट्विटरवर सध्या #SuspendKangnaRanaut असा ट्रेंड देखील सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी कंगनाने वेब सिरीज ‘तांडव’ बद्दल ट्विट केलं होतं. श्रीकृष्णाने देखील शिशुपालचे ९९ अपराध माफ केले होते व त्यानंतरच त्याचा शिरच्छेद केला होता. आधी शांती, नंतर क्रांती अशा शब्दात यांचा शिरच्छेद करण्याची वेळ जवळ आली आहे.जय श्रीकृष्ण अशा आशयाचं ट्विट तिने केलं होतं. ज्यावर चाहत्यांनी आक्षेप घेतल्यावर तिने ते ट्विट डिलिट केलं.

त्यानंतर तिने ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्से यांच्याविरुद्ध देखील ट्विट केलं होतं . एका ट्विटमध्ये डॉर्से यांनी ट्विटर हे प्रत्येकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणारे एक माध्यम असल्याचे म्हंटले होते. त्यावर त्यांच्या ट्विटला रिट्विट करत कंगनाने डॉर्से यांना खडे बोल सुनावत धारेवर धरले होते. ”ट्विटर हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याला न जपता फक्त स्वतःचा फायदा असलेल्या व्यक्तींच्या पाठीशी उभा राहतो. त्याला इस्लामिक व चिनी विचारधारेच्या लोकांनी खरेदी केलं आहे. इतरांच्या विचारांचा ट्विटर आदर करत नाही. तो विकला गेला आहे.ही लज्जास्पद गोष्ट आहे”,असं तिने म्हंटलं होतं.

ट्विटरकडून अकाउंट बंद करण्यात आल्यानंतर तिने एक ट्विट करत ”तुम्ही माझं अकाउंट हटवू शकता परंतु मला नाही हटवू शकत,माझं अकाउंट देशासाठी शहीद होऊ शकतं परंतु माझ्यातलं देशभक्तीचं व्हर्जन माझ्या चित्रपटातून पुन्हा परत येईल. माझं अकाउंट बंद करून तुम्ही मला घाबरवायचा प्रयत्न करत आहात,पण मी तुमचं जगणं अवघड करून टाकेन”,असं म्हणत परत येण्याचा शब्द दिला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments